Share

विधानपरिषद निवडणूक : संघटनेतील फुटीवरून स्वभिमानीच्या प्रदेशाध्याक्षांच मोठ विधान…

Published On: 

पुणे : ऊस दराच्या मुद्द्यावर जन्माला आलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचं विधानपरिषदेसाठी निश्चित झालेलं नाव यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना चर्चेत आहे. राजू शेट्टी यांनी सर्व पदं उपभोगली असून कार्यकर्त्यांचा सन्मान करणं गरजेचं होतं असा सूर बाहेर आहे.

एक वेळ माझा बळी देईन पण चळवळ जिवंत ठेवेन, असं उद्विघ्न वाक्य माजी खासदार राजू शेट्टी यांना म्हणावं लागलं. विधानपरिषदेची मिळालेली जागा यासाठी कारण ठरलं आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांनी गोविंद बागेत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आणि राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या जागेसाठी राजू शेट्टी यांचं नाव फायनल झालं. बरोबर हाच निर्णय काही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांना खटकला. राजू शेट्टी यांनी जो निर्णय घेतला आहे, तो निर्णय जर कार्यकर्त्यांना सांगून घेतला असता तर काहीच प्रश्न नव्हता. पण 20-20 वर्षे संघटनेसाठी काम करुन जर काहीच सन्मान होत नसेल तर काय करायचे? असा सवाल स्वाभिनामीचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील केलाय. त्यामुळेच राजू शेट्टी कमालीची डिस्टर्ब झाले.

तुकाराम मुंढे यांना जनतेचा फुल्ल सपोर्ट, विरोध करणारे सर्वपक्षीय नेते पडले तोंडघशी

दरम्यान आता घरातील भांडणावरुन संघटनेत फूट पाडणार नाही अस विधान जालिंदर पाटील यांनी केलं आहे. राजू शेट्टीवर प्रेम करणारे आम्ही सगळे मग त्यात सावकार मादनाईक असो किंवा मी आम्ही या फुटीला वाव देणार नाहीत. काही मतभेद असू शकतात घरातलं भांडण आहे. चळवळीमध्ये काम केल्याने हक्काने मागण्याचा आम्हाला अधिकार देखील आहे. सावकार मादनाईक आणि मी आम्ही 2-2 विधानसभेच्या निवडणुका लढवल्या होत्या त्यात अपयश जरी आलेल असल तरी चळवळीमध्ये संधी मिळतातच योग्य सन्मान व्हावा अशी अपेक्षा करण काही गैर नाही. अस देखील जालिंदर पाटील म्हणाले आहेत.

टिपरसे साहेबांचा दणका, ईनोव्हा गाडीतुन 97 किलो गांजा घेवुन जाताना दोघांना केली अटक

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!