मुंबई : कोरोनाने राज्यात थैमान घातले आहे. या पार्श्वभूमीवर अनेक सण साजरे करण्यावर बंधने आली आहेत. शेकडो वर्षांची वारी देखील यंदा मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडत आहे. यंदाचा गणेशोत्सव हा सामाजिक भान ठेवून व समाजोपयोगी कार्यक्रम राबवून साधेपणाने साजरा करावा आणि जगासमोर उत्सवाचा नवा आदर्श निर्माण करावा,असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल गणेशोत्सव मंडळाला केले आहे.
भुजबळांचा धडाका; आणखी तीन महिने मिळणार मोफत अन्नधान्य
दरम्यान, काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका बैठकीत बोलताना पुढील काळात आषाढी, दहिहंडी, स्वातंत्र्य दिन असे महत्त्वाचे सण-उत्सव आहेत.हे सण उत्सव साजरे करताना उत्साह कायम ठेवावा व घरातच थांबून ते साजरे करावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला आता प्रतिसाद मिळू लागला असून अनेक मंडळ आता पुढे येत आगामी काळातील सण साधेपणाने साजरा करण्याचे आश्वासन देत आहेत.
कोरोनाची जागतिक समस्या आहे, पुढील काळ कदाचित अधिक आव्हानात्मक असेल. त्यामुळे गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी तसे नियोजन करावे. यासाठी जनजागृती आवश्यक आहे.पाऊस आणि कोरोना या दोन आव्हानांविरुद्ध लढाई आहे. सर्वांनीच आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केले.
होय… मी अजितदादांचा निकटवर्तीय, वरिष्ठ पातळीवर ‘पावर’फुल ; मिटकरींची डरकाळी
दरम्यान, भाजपनेते राम कदम यांनी देखील एक मोठी घोषणा केली आहे. देशातील सर्वात मोठी दहीहंडी म्हणून नावलौकिक असलेली घाटकोपर मधील दहीहंडी यंदा फुटणार नाही. या दहीहंडीच्या कार्यक्रमाला मोठ्याप्रमाणावर गोविंदा पथक, अनेक सेलिब्रेटी हजेरी लावतात तसेच हजारो नागरिक देखील या कार्यक्रमाला उपस्थित असतात. देशासमोर असणारे कोरोनाचे संकट लक्षात घेता त्यांनी हा निर्णय घेतला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

