🕒 1 min read
मुंबई – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला काल पासून सुरूवात झाली. दरम्यान आजच्या पहिल्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाले.यावेळी बोलताना कोविंद यांनी कृषी सुधारणांचा फायदा कोट्यावधी लहान मोठ्या शेतकऱ्यांना मिळायला सुरूवात झाली असल्याचं सांगितले.
राष्ट्रपती म्हणाले, कृषी कायद्यांबद्दल शेतकऱ्यांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकार प्रत्येक आंदोलनाच आदर करते पण प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा निषेध करत असल्याचेही म्हणाले.
दरम्यान, कॉंग्रेसने राष्ट्रपतींच्या भाषणावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.संसदेच्या संयुक्त बैठकीत बोलताना राष्ट्रपतींनी सर्व संकेत व प्रथा बाजूला ठेवून केंद्र सरकारने केलेल्या तीन कृषी कायद्यांमुळे देशातील करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना फायदा झाला असे बेधडक विधान केले आहे. वस्तुस्थिती अशी आहे की हे कायदे संसदेत पास झाले असले तरी उपलब्ध माहितीनुसार त्यांच्या अंमलबजाणीसाठी आवश्यक नियमावली अजून तयार नाही. शिवाय सर्वोच्च न्यायालयाने या कायद्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती दिली आहे आणि केंद्र सरकार त्यात आवश्यक त्या सुधारणा, एवढेच नव्हे तर त्यांच्या अंमलबजावणीला स्थगिती देण्यास देखील तयार आहे.
अशा परिस्थितीत करोडो गरिब व मध्यम शेतकऱ्यांना या कायद्यामुळे फायदा झाला, असे राष्ट्रपती महोदय कशाच्या आधारे म्हणत आहेत ? की सरकारने लिहून दिले ते जसेच्या तसे वाचले ? असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व प्रवक्ते डॉ. रत्नाकर महाजन यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या
- दिल्लीतील स्फोटामागे इराणमधील दहशतवाद्यांचा हात असल्याचा संशय
- शेतकऱ्यांनी मागे हटू नये, आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत – राहुल गांधी
- करिअर निवडताना वडीलधाऱ्यांचा सल्ला घ्या; अजित पवार यांचे विद्यार्थ्यांना आवाहन
- भाजपाशीच संबंधित एका गटाने दिल्लीत गोंधळ घडवला; संजय राऊत यांचा गंभीर आरोप
- क्रीडा धोरणाला चालना देण्यासाठी क्रीडा संकुलाचे काम दर्जेदार करा- उपमुख्यमंत्री अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

