Share

World Diabetes Day | ‘या’ गोष्टी केल्याने नियंत्रणात राहू शकते डायबिटीज

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: आज 14 नोव्हेंबर रोजी जागतिक मधुमेह दिन (World Diabetes Day) साजरा केला जातो. भारतात डायबिटीजच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) नुसार, देशात 77 दशलक्षाहून अधिक लोक डायबिटीजने ग्रस्त आहेत आणि 2045 पर्यंत ही संख्या 134 दशलक्षांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. डायबिटीज हे मूत्रपिंड निकामी होणे, हृदय निकामी होणे, अंधत्व येणे, खालच्या अंगांना इजा होणे आणि पक्षाघाताचे प्रमुख कारण म्हणून ओळखले जाते. या शुगरच्या आजाराला अॅलोपॅथी सारख्या पद्धतींमध्ये उपचार उपलब्ध नाहीत. मात्र अनेक शतकांपासून प्रचलित असणाऱ्या आयुर्वेद शास्त्राने शुगर कशी नियंत्रणात ठेवावी, हे सिद्ध केलेले आहे. आयुर्वेदात अशा अनेक चिकित्सा आहेत ज्यांद्वारे कुठलीही महागडी यंत्र न वापरता किंवा ऑपरेशन न करता यावर इलाज करता येतो.

रक्तात ग्लुकोज शुगरची मात्रा वाढल्यामुळे डायबेटीस होतो. त्यामुळेच आयुर्वेदात डायबेटीसला ‘मधुमेह’ म्हटले जाते. चरक, सुश्रुत यांसारख्या महान वैद्यांनी आपल्या संहितांमध्ये डायबेटीसवरील उपचार पद्धती नमूद केल्या आहेत. आपल्या शरीरात सतत पचनाच्या व इतर मेटाबॉलिक क्रिया घडत असतात. या क्रियांमध्ये इंसुलिन हा एक महत्वाचा पाचक रस आहे. मात्र शरीरातील इंसुलिनचं प्रमाण कमी-जास्त झाल्यामुळे डायबेटीस होतो.

आयुर्वेदात अनेक वेगवेगळ्या उपचार पद्धती आहेत, ज्याचा वापर करून रुग्णाची पचन प्रक्रिया दुरुस्त केली जाते. आयुर्वेदिक औषध पद्धतीचे वैशिष्ट्य म्हणजे ते रोगावर नाही तर रोगाची कारणे दूर करण्याचे काम करते. त्यामुळे रोग मुळापासून दूर होतो आणि रुग्णाला वारंवार औषधे घ्यावी लागत नाहीत.

नियमित प्राणायाम ध्यान योग केल्यास डायबिटीस (Diabetes) नियंत्रणात ठेवता येऊ शकते

आयुर्वेदाचार्य डॉक्टर आशिष त्रिपाठी यांच्या मते, दररोज एक तास योगासने प्राणायाम आणि ध्यान केल्यास डायबिटीस वर नियंत्रण ठेवता येऊ शकते. त्याचबरोबर लवकर झोपणे लवकर उठणे या आयुर्वेदिक तत्त्वांचे पालन केल्यावर देखील डायबिटीसवर विजय मिळवता येऊ शकतो. त्याचबरोबर गुळवेल, कडुलिंब, जांभळाच्या बिया, कारल्याच्या बिया इत्यादी आयुर्वेदिक औषधींचे सेवन करून देखील मधुमेह संपुष्टात आणला जाऊ शकतो.

वजन नियंत्रित ठेवल्याने डायबिटीस वर होऊ शकते मात

वाढते वजन हे डायबिटीज होण्याचे एक मुख्य कारण आहे. त्यामुळे डायबिटीसवर नियंत्रण ठेवण्यासाठी शरीराच्या वजनावर देखील नियंत्रण ठेवणे खूप आवश्यक आहे. नियमित व्यायाम संतुलित आहार इत्यादी गोष्टी केल्याने वाढते वजन नियंत्रणात ठेवता येऊ शकते.

त्याचबरोबर अनियमित जीवनशैली, पॅक बंद पदार्थांची सेवन, शारीरिक श्रमाचा अभाव आणि ताणतणाव ही देखील डायबिटीस होण्याची प्रमुख कारणे आहेत. त्यामुळे डायबिटीस रुग्णांनी शुगर नियंत्रणात ठेवण्यासाठी जीवनशैलीत बदल करणे गरजेचे आहे त्याचबरोबर निसर्गाच्या सानिध्यात राहणे आणि नैसर्गिक अन्न ग्रहण करणे देखील आवश्यक आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!