टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्राच्या मातीत येऊन भाजपच्या अध्यक्षांनी डंका पिटवू नये. आमच्या दैवताबद्दल एकही वाईट शब्द आम्ही ऐकून घेणार नाही. ९३ साली जेव्हा मुंबईत दंगली झाल्या तेव्हा शरद पवार यांनी दंगली शांत करण्याची जबाबदारी पेलली. तुम्ही तर गुजरातमध्ये दंगली घडविण्याचे काम केले. असा घणाघात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. लातूरमध्ये आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात मुंडे बोलत होते.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप – प्रत्यारोप सुरु आहेत. भाजपने राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नेत्यांना गळाला लावत पवारांना धक्का दिला आहे, तर आता डॅमेज कंट्रोल करण्यासाठी स्वतः शरद पवार मैदानात उरतले आहेत. पवार यांनी सोलापूर, उस्मानाबाद, लातूर व बीडमध्ये कार्यकर्त्यांना मेळावा घेत विधानसभेचे रणशिंग फुंकले आहे.
मेळाव्यात बोलताना धनंजय मुंडे यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अध्यक्ष अमित शाह यांनी पुरोगामी महाराष्ट्रात येऊन शरद पवारांचा अपमान केला. मी शपथ घेतो की भाजपचे अविचार या पुरोगामी महाराष्ट्रात गाडल्याशिवाय राहणार नाही. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे सच्चे मावळे आहोत. तुमच्या ईडी बिडीची आम्हाला भीती नाही, अशी टीका मुंडे यांनी केली आहे.
छत्रपतींच्या पक्षप्रवेशाची मोठी चर्चा आहे. आमच्या छत्रपतींचे वंशज दिल्लीत गेले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी देशाच्या पंतप्रधानांनी यायला हवे होते. मात्र ज्यांची पत नाही त्यांनी छत्रपतींच्या वारसांचा पक्षप्रवेश करून घेतला. भाजप छत्रपतींची अस्मिता पूसून टाकण्याचं पाप करतंय, असंही धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे राज्याचे लक्ष
शरद पवारांनी बीडमध्ये जाहीर केली राष्ट्रवादीच्या उमेदवारांची पहिली यादी
पाकिस्तानी क्रिकेटपटू आता बिर्याणी खायला तरसणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

