Share

Dhananjay Munde | “संघर्ष माझ्या पाचविलाच पुजलेला आहे”- धनंजय मुंडे

Published On: 

बीड : एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीसोबत युती करून, राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आहे. तेव्हापासून राज्यातील राजकीय वातावरण खूप बदलेलं दिसून येतं आहे. इतकच नाहीतर पक्षनेते विरोधी पक्षातील नेत्यांवर आरोप करत असून केलेले आरोप फेटाळण्यासाठी पुन्हा प्रत्यारोप म्हणजेच या राजकीय नेत्यांची आरोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळतं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी एक वक्तव्य केलं आहे.

धनंजय मुंडे यांचं वक्तव्य-

संघर्ष माझ्या पाचविलाच पुजलेला आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. नाथ प्रतिष्ठानच्या महोत्सव उद्घाटन कार्यक्रमाच्यावेळी धनंजय मुंडे यांना बोलवण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते. नाथ प्रतिष्ठान अठराव्या वर्षामध्ये पदार्पन करत आहे. यानिमित्ताने तीन वर्षांच्या खंडानंतर या कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले होते. नाथ प्रतिष्ठानचं अध्यक्षपद धनंजय मुंडे यांच्याकडं आहे.

संकट काळात धावून येणार नाथ प्रतिष्ठाण-

धनंजय मुंडे म्हणाले की, कोविडकाळात नाथ प्रतिष्ठाननं मनातून सेवा केली. प्यायला पाणीही याच नाथ प्रतिष्ठाननं दिलं.त्याचप्रमाणे 56 हजार कुटुंबात रेशन देण्याच कामं नाथ प्रतिष्ठाननं केलं. प्रत्येक संकटाच्या काळात कोण धावून येईल, तर ते नाथ प्रतिष्ठान असल्याचं त्यांंनी सांगितलं आहे.

संकट काळात जनतेकडं पाहिल्यानंतर जीवात जीव येत होता. यंदा खऱ्या अर्थानं लोकांच्या अनेक टीकांना मी तोंड दिल असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले आहेत. तसेच नाथ प्रतिष्ठानंच्या महोत्सवाचं उद्घाटन अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते झालं असल्याचं समजतं आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!