ठाणे : एकनाथ शिंदे यांनी भाजप सोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केलं तेव्हापासून शिवसेना आणि शिंदे गट अशी विभागणी झालेली पाहायला मिळत आहे. सतत या दोन गटांमधील नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाची खेळी पाहायला मिळत असते. अशातच बुलढाण्याचे शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी एक मागणी केली आहे
प्रतापराव जाधव यांची मागणी-
श्रीकांत शिंदे यांना युवा सेना अध्यक्ष करा अशी मागणी प्रतापराव जाधव यांनी केली आहे त्यांनी ही मागणी चक्क महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर केली असल्याच समजत आहे. प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते.
युवा सेनेचे काम वाढवायचा आहे-
आपल्याला युवा सेनेचे काम वाढवायचा आहे त्यासाठी श्रीकांत शिंदे यांना लवकरात लवकर युवा सेनेची जबाबदारी द्यावी एवढीच माझी मागणी असल्याचं जाधव यांनी म्हटले आहे. पुढे ते असही म्हणाले की शिवसेना आमचीच आहे.
दरम्यान, प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर मागणी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांना या मागणीविषयी विचार आलं त्यावेळी त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Shahajibapu Patil | “अमोल मिटकरी नटून-थटून टिव्ही समोर येतात, दाढीला तेल लावतात अन्…” शहाजीबापू पाटील
- Seema Patra | धक्कादायक! भाजप नेत्या सीमा पात्राने पिडीतेला शौचालय चाटायला भाग पाडलं अन् नंतर…
- Sonia Gandhi | धक्कादायक! सोनिया गांधी यांच्या आईने इटलीमध्ये घेतला अखेरचा श्वास
- Jacqueline Fernandez | जॅकलिन फर्नांडिसच्या अडचणीत वाढ, कोर्टात हजर राहण्याचा आदेश
- Shinde-Fadnavis government | सरकारचा न्यायालयावर देखील ताबा आहे का? हा VIDEO पाहाचं


