Share

‘योगी आदित्यनाथ मुंबईतून बॉलिवूड नेऊ शकत नाही, ते अभ्यासासाठी येत असावे’

Published On: 

कोल्हापूर : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजमध्ये जाणार आहेत. महत्वाचं म्हणजे यावेळी योगी आदित्यनाथ काही बॉलिवूड सेलिब्रेटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्यासंबंधी चर्चा करणार आहेत.

१ डिसेंबरच्या रात्री योगी आदित्यनाथ लखनऊहून मुंबईसाठी रवाना होतील. २ डिसेंबरला बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा कार्यक्रम संपल्यानंतर योगी आदित्यनाथ उद्योजक आणि बॉलिवूड सेलिब्रेटींना उत्तर प्रदेशात गुंतवणुकीसाठी आमंत्रित करतील.

आता या विषयावरून नवा वाद निर्माण होत आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये खळबळ निर्माण झाली होती. यावरून महाराष्ट्र सरकारला देखील घेरण्याय आलं होतं. याच पार्श्वभूमीवर योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेशमध्ये फिल्मसिटी निर्माण करण्याबाबत हालचाली सुरु केल्या होत्या. आता, त्यांची मुंबई भेट महत्वाची मानली जात आहे.

योगींच्या या दौऱ्यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी टीका केली आहे. तर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईतून बॉलिवूड कोणीही नेऊ शकत नाही. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे बॉलिवूडप्रमाणे एखादा उद्योग त्यांच्या राज्यात सुरु करावा याच्या अभ्यासासाठी येत असावेत,” असं ते म्हणाले.

तर, ‘मुंबईतून बॉलिवूड ते नेऊ शकत नाही. तसेच मुंबईतील सुविधा इतर ठिकाणी मिळणं फार अवघड आहे. पण सुविधा उपलब्ध करुन एखादी पर्यायी सुविधा उपलब्ध केली तर काही आक्षेप असण्याचं कारण नाही,’ असं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!