🕒 1 min read
कोल्हापूर : राज्यातील तीन पदवीधर,दोन शिक्षक आणि धुळे-नंदुरबार विधान परिषदेच्या जागेसाठी निवडणूक आज पार पडत आहे. प्रचाराच्या कालच्या शेवटच्या दिवशी सर्वच उमेदवारांनी आपापले मतदारसंघ पिंजून काढले. कालच्या रविवारी सर्वच उमेदवारांनी या निवडणुकीसाठी अखेरचा संपर्क साधला.
मंगळवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून तीन पदवीधर आणि दोन शिक्षक आमदारकीसाठी मते पेटीबंद होतील. नागपूर, पुणे आणि औरंगाबाद पदवीधर, तर पुणे आणि अमरावती शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडत आहे. येत्या ३ डिसेंबर रोजी मतमोजणी आहे.कोविड 19 (कोरोना)च्या पार्श्वभूमीवर होणारी ही राज्यातील पहिलीच निवडणूक असल्याने प्रशासनाने विशेष काळजी घेवून नियोजन केलेले आहे.
दरम्यान, या 6 जागाही आम्हीच जिंकणार असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.इतकच नाही तर पुण्याची जागा तर वनवे असल्याचंही पाटील म्हणालेत. या जागांवर चुरस आहे पण विजयाची खात्री असल्याचं छातीठोकपणे चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. दरम्यान,भाजप या निवडणुकीत विजयी झाला तर राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला तो मोठा धक्का असेल आणि सरकार पाडण्याच्या भाजपच्या कारवाया अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे
महत्वाच्या बातम्या
- ठाकरे सरकारबाबत असणारी नाराजी आगामी निवडणुकीतून दाखवून देईल : दानवे
- ‘…पण मुस्लीम उमेदवारला तिकीट देणार नाही’ भाजप नेत्याचे वादग्रस्त वक्तव्य
- शिक्षणाचा बट्ट्याबोळ झाला, लोकसेवा आयोगाच्या परिक्षा होणार कधी?ठाकरे सरकारवर दानवे बरसले
- भारताने मालिका गमावली पण या पट्ठ्यानं मनं जिंकली!
- केंद्राकडून नेमके किती येणे बाकी आहे यावर आधी एकमत करा; दरेकरांचा सत्ताधाऱ्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
