Share

“धनंजय मुंडेंनी स्वतःची सहा मुलं लपवली”, करुणा मुंडेंचा गंभीर आरोप

Published On: 

कोल्हापूर : धनंजय मुंडेंवर (Dhananjay Munde) केलेल्या आरोपांनंतर चर्चेत आलेल्या शिवशक्ती पक्षाच्या करुणा मुंडे (Karuna Munde) आता निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. आगामी कोल्हापूर पोटनिवडणुकीत त्या शिवशक्ती सेनेच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. करुणा मुंडे यांनीच शिवशक्ती सेना हा पक्ष स्थापन केला असून मागील काही दिवस पक्षातर्फे कोण उमेदवार असेल यावर विचार विनिमय झाले आणि तद्पश्चात करुणा मुंडे यांनी स्वतःच निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्याअगोदर करुणा मुंडे करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेण्यासाठी पोहोचल्या होत्या. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असतांना त्यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप केले.

यावेळी बोलत असतांना करुणा मुंडे म्हणाल्या की,‘धनंजय मुंडे यांनी स्वतःची सहा मुले लपवली. अनेक बायकाही लपवल्या.’ तसेच लवकरच करुणा आणि धनंजय यांची प्रेमकहाणी मराठीत येणार असून त्यावर काम सुरू असल्याचेही त्या म्हणाल्या.

दरम्यान, धनंजय मुंडें यांना अर्ज भरण्यासाठी तांत्रिक अडचणी येतील. माझ्याकडे कायदेशीर सर्व पुरावे असल्यामुळे मला अर्ज करण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!