परळी : नुकत्याच घोषित झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) निकालामध्ये देशातून २२ वा आलेल्या बीड जिल्ह्यातील मंदार जयंत पत्की याचे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी अभिनंदन केले आहे. धनंजय मुंडे यांनी दूरध्वनीवरून मंदारशी संपर्क करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच ट्विट करूनही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
आमच्या बीडचा मंदार वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी देशातून २२ वा आला. त्याचा मला अभिमान वाटतो. देशाच्या सर्वोच्च नागरी सेवेतून मंदारने आपले व जिल्ह्याचे नाव उंचावेल अशी कामगिरी करावी अशा शब्दात मुंडे यांनी मंदारला शुभेच्छा दिल्या आहेत.
बीड येथील संस्कार विद्यालयात शालेय शिक्षण घेतलेल्या मंदार याने पुढे पॉलिटेक्निक व अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. महावितरण मध्ये सेवानिवृत्त झालेल्या जयंत पत्की यांचा मंदार हा मुलगा असून, यूपीएससी परीक्षेत वयाच्या अवघ्या २३ व्या वर्षी त्यांने उल्लेखनीय यश मिळवले आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या देखील कोरोना बाधित
राज्यातील ‘या’ महत्वाच्या शहरात ७ ऑगस्ट पासून पुन्हा लॉकडाऊन
‘शिवसेनेला हिंदूत्व व सामाजिक बांधिलकीचा विसर;राजकिय किंमत मोजावी लागणार’
भूमिपूजन समारोहासाठी कोकण प्रांतातील मठ,मंदिरांची माती व पवित्र नदयांचे जल अयोध्येला पाठवले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
