Share

‘शिवाजी महाराज आमचे दैवत,ज्या मातीत काम करता त्यासोबत तरी इमान ठेवा’

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा : ‘कौन बनेगा करोडपती’ हा सोनी टीव्हीवरील सर्वात चर्चेत असणारा कार्य्कार्म असून बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन हे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत. मात्र आता ‘कौन बनेगा करोडपती’चा 11 वा सीजन वादात अडकला आहे. केबीसीमध्ये विचारण्यात आलेल्या एका प्रश्नामध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांचा उल्लेख एकेरी करण्यात आल्याने सोशल मीडियातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि सोनी टीव्हीवर टीकेची झोड उठली आहे. नेटिझन्स या मुद्द्यावरुन अमिताभ बच्चन यांना ट्रोल करत आहेत. तर अमिताभ बच्चन यांनी माफी मागावी, अशी मागणीही नेटिझन्सकडून केली जात आहे.

आता यावर राष्टवादी कॉंग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी यावर सोनी टीव्हीला चांगलच सुनावलं आहे. सोनी टिव्हीवरील केबीसी या शोमध्ये महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केला गेला. हा अवघ्या महाराष्ट्राचा अपमान आहे. हे सहन केले जाणार नाही. ज्या मातीत काम करता त्यासोबत इमान ठेवावा. सोनी टीव्हीने महाराष्ट्राची माफी मागावी. अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.

तर दुसरीकडे भाजप आमदार नितेश राणे हे देखील चांगलेच संतापले आहेत. आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन सोनी टीव्ही आणि केबेसीने अपमान केला आहे. त्यांनी लवकर माफी मागा नाही तर शो ची एक पण लाईफलाईन राहणार नाही ! अस ट्विट करत नितेश राणे यांनी सोनी टीव्हीला सज्जड दम दिला आहे.

काय आहे प्रकरण ?

गुजरातहून आलेल्या स्पर्धक शाहेदा चंद्रन या अमिताभ बच्चन यांच्यासमोर हॉट सीटवर बसल्या होत्या. ‘यापैकी कोणता शासक मुघल सम्राट औरंगजेबचा समकालीन होता?’ असा प्रश्न आमिताभ बच्चन यांनी त्यांना विचारला. त्यासाठी चार पर्याय देण्यात आले.

1. महाराणा प्रताप
2. राणा सांगा
3. महाराजा रणजीत सिंह
4. शिवाजी

या पर्यायांमध्ये शिवाजी महाराजांचा उल्लेख करण्यात आला होता. औरंगजेबच्या नावापुढे ‘मुघल सम्राट’ लावू शकता तर राज्याभिषेक झालेल्या छत्रपतींचा उल्लेख एकेरी का?, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवरायांचा एकेरी उल्लेख पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला. ट्विटरवर नेटिझन्स #boycottKBC हा हॅशटॅश सुरु करुन ‘कौन बनेगा करोडपती-11’ न पाहण्याचं आवाहन करत आहेत.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1192688241947791360?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192681340354711554?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1192674042370609152?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!