🕒 1 min read
परळी : मागील काही दिवसांमध्ये परळी शहरात दोघाजनांमध्ये झालेल्या वैयक्तिक भांडणाचे मध्ये जात आणून राजकारण केल्यावरून सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
मला कधीच जात-पात शिवली नाही, परळीतील प्रत्येक कुटुंबाचा मी सदस्य आहे. सगळेजण माझ्या जवळचे आहेत. कोणाचाही वैयक्तिक भांडणात जात-पात आणून त्यात माझे नाव गोवणे म्हणजे निव्वळ काम नसल्याचे लक्षण आहे असा टोला धनंजय मुंडेंनी लगावला आहे.
तसेच सामाजिक सलोखा व आपसातील नाते अबाधित ठेवून परळीच्या विकासात हातभार लावण्याचे आवाहनही मुंडेंनी उपस्थितांना केले. यावेळी अनेक मान्यवरांसह परळी व परिसरातील नागरिक प्रचंड संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या परळी ते अंबेजोगाई रस्त्याचे काम येत्या ४ दिवसात सुरू होईल, मागील ५ वर्ष थांबलात, मलाही थोडा वेळ द्या असे म्हणत धनंजय मुंडे यांनी उपस्थितांची मने जिंकली. अंबेजोगाई रस्त्याबरोबरच ४ वेळ भूमिपूजन होऊनही साधे टेंडर सुद्धा होऊ शकले नाही तो परळीचा बाह्यवळण रस्त्याचे कामही एप्रिल महिन्यात सुरू करणार असल्याचे यावेळी मुंडे म्हणाले.
तर दुसरीकडे, ‘जेव्हा परळीकर धनंजय मुंडे यांना निवडून देतील, तेव्हाच मी फेटा बांधीन,’ हा खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवस्वराज्य यात्रेत केलेला प्रण धनंजय मुंडे यांच्या हस्ते फेटा बांधून पूर्ण केला.
निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्ताने मी परळीत आलो, आपणाला आवाहन केले, धनंजय मुंडे आमदार होत नाहीत तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असा प्रण मी केला, माझ्या या आवाहनाला आपण भरभरून प्रतिसाद देत मला पुन्हा एकदा फेटा बांधण्याचा बहुमान दिला, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. धनंजय मुंडे यांच्या रूपाने एक कर्तबगार मंत्री आपण निवडून दिलात, त्यांच्या कर्तबगारीवर आम्हाला अभिमान आहे असे यावेळी बोलताना खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

