Share

भ्रष्टाचार बाहेर निघून त्याची लक्तरे वेशीवर टांगली जावू नये यासाठी ही दडपशाही ?

Published On: 

मुंबई – भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर आर्थिक गैरव्यवहाराचे गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, या घोटाळ्यांची माहिती देण्यासाठी तसेच काही ठिकाणांची पाहणी करण्यासाठी सोमय्या कोल्हापूरकडे रवाना होण्याआधीच काल कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी सोमय्या यांना नोटीस बजावली आणि त्यांना जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली. तरीही कोल्हापूरकडे निघालेल्या सोमय्या यांना अखेर कराडमध्ये रेलेवेतून उतरवण्यात आले.

विशेष म्हणजे काल सोमय्या यांच्या मुलुंडमधील घराजवळ मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. या सर्व प्रकारावर आता भाजप प्रदेश सचिव ॲड धर्मपाल मेश्राम यांनी भाष्य केले आहे. किरीट सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा होऊ नये याकरिता जिल्हाबंदीची नोटीस देणे ही लोकशाहीची क्रुर थट्टा असून संवैधानिक मुल्ये पायदळी तुडविण्याचा प्रकार असल्याची प्रतिक्रिया मेश्राम यांनी दिली आहे.

एरवी संविधान बचावासाठी उर बडवणा-या आणि संविधानाचे दाखले देणा-या पुरोगामी म्हणविणा -या महाविकास आघाडी सरकारने त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांचा भ्रष्टाचार बाहेर निघून त्याची लक्तरे वेशीवर टांगली जावू नये यासाठी ही दडपशाही चालवलेली असून महाराष्ट्रातील सुजाण व जागरूक जनता फार काळ हे सहन करणार नसल्याचेही मत त्यांनी व्यक्त केले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!