Share

मुलांचे लग्न धूमधडाक्यात करणाऱ्या देवराम लांडे यांच्या अडचणी वाढल्या ; दोन गुन्हे दाखल

Published On: 

 पुणे : कोरोना काळात सर्वसामान्य जनतेला वेगळे नियम आणि राजकीय नेत्यांना वेगळे नियम आहेत का असा सवाल उपस्थित करण्याची वेळ आली आहे. पुण्यातील शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्यांनी मुलाच्या लग्नात कोरोना नियमांची अक्षरशः ऐशी तैशी केली आहे. दोनशे वऱ्हाडीची मुभा असताना तब्बल दोन हजार वऱ्हाडीच्या उपस्थित लग्न सोहळा पार पाडला. शिवाय वऱ्हातीला डिजेचा दणदणाट ही केला.

दरम्यान, आता देवराम लांडे यांच्यासह जुन्नर येथील मंगल कार्यालयाचे मालक तसेच व्याही अशा एकूण सहा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. जून्नर पोलीसांनी आपत्ती प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल केला. त्यापाठोपाठ संध्याकाळी केवाडी ता. जुन्नर गावामध्ये वरातीसाठी ५०० ते ७०० लोकांचा जमाव जमवुन डीजे वाजवल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार गणेश बाळूजोरी यांनी दिली. त्यामुळे डीजे मालक व देवराम लांडे यांच्यावर दुसरा गुन्हा दाखल झाला. हा गुन्हा दाखल झल्यामुळे देवराम लांडे यांच्या विरोधात २४ तासात सलग दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

कोरोना काळात नियमांचे उल्लंघन केले, जिल्हाधिकाऱ्यांचे जमावबंदी आदेश न  जुमानता स्वतःच्या दोन मुलांच्या लग्न सोहळ्यासाठी १८०० ते २००० लोक एकत्र केले असल्याची फिर्याद पोलिस अम्मलदार अमोल अशोक शिंदे यांनी दिली. यामुळे मंगल कार्यालय मालक केदारी, जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे, दोन व्याही यांच्या विरोधात जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस निरीक्षक विकास जाधव यांनी सांगितले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!