मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध पुरावे देणार असल्याचे सोशल मीडियावर जाहीर करत, परळी शहरामध्ये आलेल्या करुणा शर्मा यांना काही महिलांनी रविवारी घेराव घातला. यातच, शर्मा यांच्या गाडीमध्ये पिस्तुल सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा पोलिस तपास करत आहेत. तर, ‘पिस्तुल माझे नसून, मला अडचणीत आणण्यासाठी जाणीवपूर्वक हे पिस्तुल गाडीत टाकले आहे,’ असा आरोप शर्मा यांनी केला. तसेच त्यांच्यावरच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला आणि पोलिसांनी त्यांना अटक केली.
या प्रकरणावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘यासंदर्भात संपूर्ण चौकशी झाली पाहिजे. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे, त्यापासून कोणालाही वंचित ठेवण्याचे कारण नाही. त्या ठिकाणी जे काही घडले आहे त्यावरुन कायदा-सुव्यवस्था कशी राखली जात आहे हे स्पष्ट होत आहे. जे आरोप प्रत्युत्तर होत आहेत आणि मिळालेले पिस्तूल हे गंभीर असून यासंदर्भात कोणत्याही दबाबाशिवाय चौकशी झाली पाहिजे’, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.
दरम्यान, परळी शहरात रविवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. करुणा शर्मा यांनी दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल करत परळीत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती. या पत्रकार परिषदेत आपण आपले पती व इतरांच्या विरोधात अनेक पुरावे सादर करून काही गोष्टींचा व षडयंत्राचा खुलासा करणार असल्याचे सांगितले होते.
त्यानूसार करुणा शर्मा या रविवारी दुपारी परळीत दाखल झाल्या होत्या. वैद्यनाथ मंदिर परिसरात दर्शन घेऊन जात असतांनाच त्यांची मंदिर परिसरात काही महिलांशी बाचाबाची झाली. यावेळी करुणा शर्मा यांनी आपल्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार एका महिलेने शहर पोलिसांत दाखल केली होती. त्यानूसार पोलिसांनी करुणा शर्मा यांच्याविरोधात अॅट्राॅसिटी तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. करुणा यांना पोलिसा ठाण्यात नेत असतांनाच पोलिसांनी त्यांच्या गाडीची झडती घेतली. तेव्हा कारच्या मागच्या बाजूला पोलिसांना एक गावठी पिस्तुल देखील आढळून आले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘…तर अजित पवार आणि अनिल परबांविरोधात देखील सीबीआय लागेल’; चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ
- राज्यात राजकीय संघर्ष; एकमेकांवर आरोप करताना मर्यादेचा विसर पडतोय – शरद पवार
- शेतकरी आंदोलक आक्रमक ; राकेश टिकैत यांनी केली २७ सप्टेंबरला भारत बंदची घोषणा
- अजिंक्य रहाणे शून्यावर बाद; नेटकरी म्हणाले, ‘जारवोप्रमाणे रहाणेला ओढून बाहेर काढा’
- ब्राह्मण हे विदेशी आहेत, असं वक्तव्य केल्याने छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल


