Share

‘बंद दाराआडील वचनांवर बोलतात, मात्र शेतकऱ्यांना बांधावर दिलेल्या वचनांवर बोलत नाहीत’

Published On: 

मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. अखेरच्या दिवशी देखील भाजपने कमालीची आक्रमक भूमिका घेतली आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर अनेक मुद्द्यांवरून भाजपने महाविकास आघाडी सरकारला घेरण्यासाठी मोर्चेबांधणी केली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनात बोलताना भाजपच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. गृहमंत्री अमित शाह यांनी बंद दाराआड दिलेल्या वचनापासून ते दिल्लीतील शेतकरी आंदोलनापर्यंत त्यांनी भाष्य केलं होतं. राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तासभर बोलले होते.

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलं आहे. ‘बंद दाराआड दिलेल्या वचनांवर मुख्यमंत्री बोलतात.पण शेतकऱ्यांना जे वचन बांधावर जाऊन दिले, त्यावर का बोलत नाही? मुख्यमंत्री जर निर्लज्ज शब्द वापरत असतील, तर यासाठी कोणता शब्द वापरावा?’ असा सवाल देखील देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महाराष्ट्राबाबत मात्र उद्धव ठाकरे बोलू शकले नाहीत – फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर देवेंद्र फडणवीस यांनी टीकास्त्र सोडलं होतं. ‘राज्यपालांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर जी चर्चा झाली, त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री आपल्या तासभराच्या भाषणात सर्वत्र प्रवास करीत असताना महाराष्ट्रात मात्र ते येऊ शकले नाही. चीन, पाकिस्तान, अमेरिका, उत्तरप्रदेश, पंजाब, बिहार, काश्मीर आणि अगदी दक्षिणेपर्यंत ते गेले. पण, महाराष्ट्राबाबत मात्र ते बोलू शकले नाही.’ अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली होती.

‘शेेतकर्‍यांसंदर्भात एकही मुद्दा मांडू शकले नाही. बोंडअळी, विमा, वीजतोडणी कशावरही बोलले नाहीत. महाराष्ट्रातील लाखो शेतकर्‍यांची वीज तोडणार्‍या मुख्यमंत्र्यांना सिंधू सीमेवरील शेतकर्‍यांची चिंता आहे,’ असा घणाघात देखील फडणवीसांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!