मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील निवासस्थानी सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा टाकला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. त्यामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची दाट शक्यता आहे. अनिल देशमुख हे मंत्रपदी असताना ज्ञानेश्वरी हे निवासस्थान देण्यात आलं. ते अजूनही या ठिकाणी वास्तव्यास असतात. या निवासस्थानी देखील ईडीने छापेमारी केली आहे.
ईडीकडून करण्यात येत असलेल्या या कारवाईवर शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी भाष्य करताना भाजपवर बोचरी टीका केली होती. सीबीआय, ईडी काय भाजपाची कार्यकर्ती आहे का?, असा सवाल संजय राऊत यांनी विचारला आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन केंद्र सरकार विनाकारण त्रास देण्याचं काम करत असल्याचा आरोप देखील राऊत यांनी केला आहे. तसेच, जर ईडी आणि सीबीआय तपास करायचाच असेल तर अयोध्येच्या महापौरांनी अयोध्या मंदिर ट्रस्टसोबत जो व्यवहार केला, त्या प्रकरणाचा तपास करा. ती केस त्यांच्यासाठी फिट आहे, असा सल्ला देखील संजय राऊत यांनी दिला होता.
यावर आता माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘संजय राऊतांना राष्ट्रवादीने सुपारी दिलीये. तीच सुपारी ते वाजवतायत. त्यांना अयोध्येसंदर्भात अधिकारच नाही. अयोध्येचा त्यांचं काही योगदान आहे का ? ते केवळ तोंडाची वाफ दवडतात. अयोध्येची लढाई लढणारे आम्ही आहोत,’ असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘फटाके फुटायला सुरुवात झालीये, लिस्ट बरीच मोठी आहे!’
- दूध उत्पादकांना दिलासा : दूध दरात वाढीसह एफ. आर. पी. चा कायदा करणार
- ‘आघाडी सरकारचा कारभार आणीबाणीची आठवण करून देणारा;’ केशव उपाध्येंची टीका
- पदासाठी व्यक्ती कुठल्या थराला जाऊ शकते याचा जिवंत वस्तुपाठ म्हणजे आणीबाणी-चंद्रकांत पाटील
- ‘सुप्रिया सुळेंना आणीबाणीचं काय माहितीये ?’; फडणवीसांचा पलटवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

