Share

दिल्लीत राजकीय हालचालींना वेग, देवेंद्र फडणविसांनी घेतली मोदी-शहांची भेट

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : अंबानी स्फोटक प्रकरणात सुरु असलेल्या चौकशीत प्रत्येक दिवशी नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. मुंबईमध्ये गाडीत स्फोटक सापडल्या प्रकरणी मुंबई पोलीस दलाचे निलंबित अधिकारी सचिन वाझे यांना राष्ट्रीय सुरक्षा तपास यंत्रणा अर्थात एनआयएने अटक केली आहे. सचिन वाझेंना २५ मार्च पर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. सचिन वाझे प्रकरणात राज्यातील ठाकरे सरकार अडचणीत आले असताना आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

काल रात्री उशीरा पतंप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यात राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली आहे. काल देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली, त्यानंतर लगेचच ही भेट झाली आहे.

देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यातील ही भेट राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर असल्याचे बोलले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात सुरु असलेल्या घडामोडींची नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना माहिती दिली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राज्यात यापुढे काय पावलं उचलावी, या राजकीय स्थितीचा फायदा घेता येईल का? याचीही चर्चा झाली असल्याची दाट शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!