🕒 1 min read
औरंंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेने अल्प काळासाठी नांदेड- पनवेल या विशेष रेल्वेगाडीची घोषणा केली आहे. अवघ्या आठ फे-या होणार असल्याने रेल्वेला प्रवाशांच्या प्रतिसादाची गरज आहे. जालना, परभणी आणि औरंगाबाद जिल्ह्यातील हजारो प्रवाशांसाठी अत्यंत सोयीस्कर वेळा ठेवण्यात आलेल्या असल्याने प्रवाशांनी या रेल्वेला भरभरुन प्रतिसाद देण्याची गरज आहे.
दक्षिण मध्य रेल्वेने नांदेड पनवेल या रेल्वेची नुकतीच घोषणा केली. त्यानुसार ही रेल्वे आठवड्यातून चार दिवस औरंगाबाद मार्गे चालवण्यात येणार आहे. दरम्यान सोलापूर विभागात मध्य रेल्वेच्या भाळवणी ते भिगवण दरम्यान सुरु असलेल्या दुहेरीकरणामुळे हा तात्पुरता बदल केला आहे.
मात्र या मार्गावर भरभरुन प्रतिसाद मिळाल्यास ही गाडी मराठवड्याच्या पदरात पडू शकते. नांदेड पनवेल दरम्यान सोमवार, बुधवार, गुरूवार आणि शनिवार तर पनवेल-नांदेड दरम्यान मंगळवार, गुरूवार, शुक्रवार आणि रविवार दरम्यान दोन्ही बाजूने प्रत्येकी अवघ्या आठ ट्रिप ही गाडी करणार आहे. नांदेड वरून १८ मार्च पासून आणि पनवेलहून १९ मार्च पासून प्रवाशांच्या मागणीमुळे प्रयोगीक तत्वावर ही रेल्वे धावत आहे.
महत्वाच्या बातम्या
- चौथा सामना जिंकण्यासाठी भारताला कराव्या लागतील ‘या’ चार गोष्टी
- नांदेड जिल्ह्यात कर्जबाजारी झालेल्या दोन शेतकऱ्यांची आत्महत्या
- परभणीकरांनी महानगरपालिकेचे थकवले ९३ कोटी; करवसुलीसाठी मनपा आक्रमक
- इशान किशनच्या फलंदाजी क्रमवारीत बदल केल्याने संजय मांजरेकरांची टिका
- युवराजची बॅट पुन्हा तळपली; पुन्हा केली षटकांराची बरसात
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
