🕒 1 min read
मुंबई : आपल्या अजब-गजब वक्तव्यामुळे चर्चेत असलेली बॉलिवूडमधील कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखी सावंत ही पुन्हा एकदा बिग बॉसच्या घरात गेली होती. तिथे तिने खळबळजनक खुलासे केले होते. बिग बॉस 14′ संपला. पण या शोची सर्वात मोठी एंटरटेनर राखी सावंत हिचे ‘बिग बॉस’ प्रेम कमी व्हायचे नाव नाही.
अगदी पापाराझींच्या कॅमे-यासमोरही राखी ‘बिग बॉस’सारखी मस्ती करताना दिसतेय. इतकेच नाही तर लोकांना बोलवून बोलवून सेल्फी देतेय. तिचा नवा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय व्हिडीओत राखी पिंक कलरच्या जिम आऊटफिटमध्ये दिसतेय. समोर पापाराझींचे कॅमेरे पाहून राखी तिच्या अंदाजात नखरे सुरु करते. क्या मैं स्लिम हो रही हूं बिग बॉस? आपने मुझे बहुत पराठे और राइस खिलाया है बिग बॉस, असे ती म्हणते. यानंतर आईच्या प्रकृतीची माहितीही तिने दिली.
आईचा किमो सुरु आहे. किमो झाल्यावर दोन दिवस ती शुद्धीवर नसते. शुद्धीवर आल्यावर औषधं द्यावी लागतात, असे म्हणते आणि अचानक समोर उभ्या असलेल्या अंकलला तुम्हाला सेल्फी हवी का? असे विचारलेत. यानंतर समोरच्या लोकांना बोलावून बोलावून सेल्फी देते. दरम्यान ती सांगते कि मला वोट करायच. मैं जिधर भी जाऊं, किसी भी रिअॅलिटी शो में मुझे वोट करने का, असे ती म्हणते आहे.
महत्वाच्या बातम्या
- पुण्यात परिस्थिती हाताबाहेर ? महापौरांनी बोलावली तातडीची बैठक
- सोशल मीडियावर महिलेची बदनामी
- वनिता खरातचा बोल्ड फोटोशूट पुन्हा एकदा चर्चेचा विषय
- ‘जीन्स नाही तुमची बुद्धी फाटलेली आहे’, महुआ मोइत्रांची मुख्यमंत्री रावत यांच्यावर जोरदार टीका
- सत्तेत असतांना एक शब्दही न काढणाऱ्यांना आत्ताच भ्रष्टाचार का आठवत आहे? बागडेंंचा विरोधकांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
