Share

 अत्याचार करणाऱ्याचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला

Published On: 

🕒 1 min read

औरंंगाबाद : पती पासून विभक्त राहणाNया विवाहीतेला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला विविधी ठिकाणी नेत तिच्यावर बलात्कार करुन जातीवाचक शिवीगाळ तसेच जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात अनिल रविंद्रदत्त जुयाल (वय ३८, रा. संभाजी कॉलनी, एन-६ सिडको) याने सादर केलेला नियमीत जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.के. कुलकर्णी यांनी फेटाळला.

प्रकरणात २७ वर्षीय विवाहीतेने फिर्याद दिली. त्यानूसार, फिर्यादीचे लग्न झाले असून तिला आठ वर्षांचा मुलगा देखील आहे. फिर्यादी चार वर्षांपासून पती पासून विभक्त राहते. फिर्यादी ही फेबु्रवारी २०१९ मध्ये चितेगावातील एका कंपनीत कामाला असतांना तिची ओळख अनिल जुयाल याच्यासोबत झाली होती.

अनिल जुयाल याने पीडितेला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. मे २०१९ मध्ये जुयाल याने पीडितेला रेल्वे स्टेशन येथील एका लॉजवर नेत तिला आयुष्यभर सांभाळ करीन, चांगल्या पगाराच्या ठिकाणी नोकरीला लावीन असे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला होता. त्यानंतर अनिल जुवाल याने पीडितेला खुलताबाद, म्हैसमाळसह विविध लॉज, हॉटेल व घरी नेऊन बलात्कार केला होता. १४ फेबु्रवारी रोजी जुयाल याने पीडितेला फोन करुन म्हैसमाळ येथे सोबत चलण्यास सांगितले असता, तीने नकार दिला. त्यामुळे चिडलेल्या आरोपीने तिला मारहाण करुन जातीवाचक शिवीगाळ केली. प्रकरणात वेदांतनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक सरकारी वकील मधुकर आहेर यांनी सरकार पक्षाच्या वतीने काम बघीतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!