🕒 1 min read
मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजप पक्षासोबत युती करून राज्यात सरकार स्थापन केलं. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार पडलं. त्याचबरोबर शिंदे यांनी शिवसेना पक्षातील काही आमदार आणि खासदारांना सोबत घेऊन ही नवीन युती केली. तेव्हापासून शिंदे गट आणि ठाकरे गट असे गट झाले आहेत. त्यामुळे माविआ पक्षनेत्यांकडून सतत शिंदे गटातील नेत्यांना गद्दार म्हटलं जातं. याच मुद्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही अनेकदा शिंदे गटावर टीका केली आहे. याच पार्श्वभूमिवर शिंदे गटाचे नेते पाणी पुरवठा मंत्री आणि स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर हल्ला केला आहे.
गुलाबराव पाटील यांचे वक्तव्य –
अजित पवार यांनीही सकाळचा शपथविधी केला होता. मग आम्ही पण त्यांना गद्दार म्हणायचे का, असा खोचक सवाल करत गुलाबराव पाटील यांनी अजित पवारांवर चांगलाच पलटवार केला आहे. गुलाबराव पाटील एका कार्यक्रमाला उपस्थित होते,त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
पुढे गुलाबराव असंही म्हणाले की, सध्या राज्यात असलेल्या शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना मदत केली. साडेतीनशे कोटी रुपये जळगाव जिल्ह्यासाठी मिळाले. हे पण त्यांनी मान्य करायला पाहिजे. परंतू त्यांनी आम्हाला गद्दार म्हटलं आहे. अजित पवार हे विरोधी पक्ष नेते आहेत. त्यामुळे सरकारच्या चांगल्या व वाईट अशा दोन्ही गोष्टी सांगण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी फक्त सरकारवर टीका केली असून सरकारच्या चांगल्या कामाबद्दल अजित पवार यांनी ऊहापोह केला नसल्याचंही गुलाबराव पाटील यांनी सांगितलं.
दरम्यान, शिंदे गटातील आमदारांना सत्तेची मस्ती, नशा चढली असल्याचं अजित पवार यांनी म्हटलं होतं. पुढे बोलताना पवार असंही म्हणाले की, कोणीही ताम्रपट घेऊन जन्माला आलेले नाहीत. एक जरी आमदार कमी झाला तरी सरकार पडेल.
महत्वाच्या बातम्या :
- Rishabh Pant । ऋषभ पंत भारतीय T20 संघाचा कर्णधार असेल, ‘या’ माजी खेळाडूच मोठं भाकीत
- Ramdas Kadam । “…तर उद्धव ठाकरे शिवतीर्थावरून सोनिया गांधींचे विचार मांडतील”, रामदास कदमांची टीका
- Bhaskar Jadhav । सापाला दूध पाजलं, तरी तो विषच ओकणार; भास्कर जाधवांची जहरी टीका
- Marathwada Mukti Sangram Day 2022 | मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा
- Narayan Rane |आदित्य बालिश आहेस, गप्प बस; नारायण राणेंचा इशारा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
