मुंबई : अभिनेता कमाल खान आणि मिका सिंग याच्यात सध्या वाद सुरु आहे. या वादात विंदूनं मिकाची बाजू घेत कमालवर टीका केली होती. ही टीका त्याला आवडली नाही म्हणून केआरकेनं त्याची तुलना एका डुकरासोबत केली. त्यामुळे आता केआरकेने अभिनेता विंदू दारा सिंगसोबत पंगा घेतला आहे.
याआधी विंदूने संताप व्यक्त करत केआरकेला सल्ला दिला होता की, ‘केआरके हा विक्षिप्त व्यक्ती आहे. जर रिव्हू करण्यासाठी त्याला पैसे मिळाले तर तो त्यांची स्तुती करतो, आणि जर पैसे मिळाले नाही तर चित्रपटावर टीका करतो.’

यावर केआरकेनं देखील जोरदार प्रतिक्रिया दिली. ‘माणसं आपल्या लायकीनुसारचं बोलतात. पाच वर्षांपूर्वी आजय देवगणनं २५ लाख रुपये घेऊन निगेटिव्ह रिव्ह्यू दिल्याचा आरोप माझ्यावर केला होता. अन् हाच आरोप आता तू करतो आहेस. पण तू पॉझिटिव्ह रिव्ह्यूसाठी पाच लाख घेतले असं सांगतो आहेस. अरे भिकारी माणसा तुझ्यासारखा मी भीकारी नाही.’ अशा आशयाचं ट्विट करुन केआरकेनं विंदू दारासिंगसोबत आता आणखी वाद निर्माण केला आहे.
अभिनेता कमाल रशिद खान नेहमी त्याच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतो. मात्र त्याच्या या वक्तव्यामुळे तो अनेकवेळा अडचणीत देखील सापडला आहे. ‘राधे’ चित्रपटाच्या रिव्ह्यू संदर्भात अभिनेता सलमान खानने मुंबई कोर्टात केआरकेवर मानहानीचा दावा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील ओबीसी नेत्यांच्या नाकावर टिच्चून होणार निवडणुका ?
- कालची बैठक म्हणजे जनाधार गमावलेल्या नेत्यांचा केवळ बातमीत राहण्यापुरता केविलवाणा प्रयत्न ?
- डेल्टा व्हेरिएंटचा धोका! ‘तत्काळ उपाययोजना करा’, केंद्राचा महाराष्ट्रासह तीन राज्यांना इशारा
- आता राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून नगरमध्ये भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ करणार
- ‘जाणत्यां’ना या वयात हेही चवनप्राश, ‘राष्ट्र मंच’च्या बैठकीवरून भातखळकरांनी उडवली खिल्ली
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा


