Share

पंढरपूर निकालाने राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली – रावसाहेब दानवे

Published On: 

🕒 1 min read

औरंगबाद : पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक २०२१ मध्ये भाजपाचे आमदार समाधान औताडे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन करत केंद्रीय मंत्री रावसाहेब यांनी तिन्ही पक्षाचा समाचार घेत वक्तव्य केले. तसेच कोरोना संसर्गाची बिकट परिस्थिती पाहता मंत्र्यांमध्ये ताळमेळ नसल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात भारतीय जनता पार्टी-शिवसेना युतिला बहुमत मिळाले होते. जनमत हे भाजपच्य बाजुने होते. परंतु, दगाफटका करुन तिन्हि पक्षांनी हे सरकार बनवलं, हे लोकांना मान्य नाही. या निकालावरुन हे स्पष्ट झालेल आहे. तसेच राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा काय असणार आहे हे या निवडणूकीच्या निकालावरुन स्पष्ट झालं आहे.

गेल्या दोन वर्षाच्या काळात राज्यातील विकास पुर्णपणे ठप्प आहे. भाजप सरकारने केलेले कामच अजुन सुरु आहे, नविन कामाला कुठेही सुरवात नाही. तिन पक्षाच सरकार आहे आणि तिन्ही पक्षांमधे समन्वय नाही, राजेश टोपे म्हणतात ८० हजार लसीचे डोझ पाहिजे, वडेट्टीवार म्हणतात ६० हजार लसीचे डोझ पाहीजे, थोरात म्हणतात ५० हजार लसीचे डोझ पाहीजे. या सरकार मधील मंत्र्यांच्या बोलण्याचा ताळमेळ नाही आहे.

तसेच शेतकरी, शेतमजूर हे राज्यामध्ये अडचणीत आलेले आहेत. शेतकऱ्यांची नुकसानभरपाई अजूनपर्यंत दिलेली नाही. अश्या अनेक अडचणी महाराष्ट्राच्या जनतेला या सरकार मुळे होत आहेत. राज्याच्या राजकारणाची पुढची दिशा स्पष्ट झाली असून आता हे निश्चित आहे की जिल्हा परिषद, पंचायत समित्या, आणि नगर पालिकेच्या निवडणूकीमध्ये हे संपूर्णपणे साफ होणार आहे असे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!