Share

Devendra Fadnavis | “तुमची शेवटची निवडणूक” म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना फडणवीसांनी दिलं प्रत्युत्तर म्हणाले…

Published On: 

मुंबई :  शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मुंबईतील गोरेगावातील शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाषण करतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. उद्धव ठाकरे यांचा टीकेचा रोख हा एकनाथ शिंदे आणि भाजपावर दिसून आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांबद्दल बोलताना ठाकरे म्हणाले की, फडणवीस ही तुमच्या आयुष्यातील शेवटची निवडणूक आहे. आम्ही आमच्या आयुष्यातील पहिली निवडणूक आहे, असं लढणार आहोत. याच वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

उद्धव ठाकरे यांचं कालचं भाषण निराशेचं होतं. मुद्दई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है, जो तकदीर में लिखा होता है, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच पलटवार केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.

फडणवीसांनी महाविकास आघाडीवर केला आरोप-

पुढे बोलताना फडणवीस सांगितले, 2019ला महाविकास आघाडी सरकारने मला संपवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेव्हाही मला ते संपवू शकले नाहीत आणि आता पुढेही संपवू शकणार नाहीत.

आमच्या पाठीत खंजीर खुपसला –

तसेच, यांनी 2019 ला मोदींचा फोटो दाखवून हे निवडून आले. मात्र निवडून आल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत आघाडी केली. आमच्या पाठीत खंजीर खुपसला. मग त्यावेळी त्यांनी का राजीनामा देऊन परत निवडणूक घेतली नाही?, असा सवालही फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना केला आहे.

 महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!