Share

Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी दसरा मेळाव्याबाबत दिली महत्वाची माहिती, म्हणाले…

Published On: 

मुंबई : आज शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा (Dasara Melava) होणार आहे. परंतू यावेळी शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहेत. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाचा बीकेसी मैदानावर होणार आहे. तर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा मेळावा शिवाजी पार्कवर. दसरा मेळाव्यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या. अखेर आज तो दिवस येऊन ठेपला आहे.त्यामुळे राज्यातील सर्व जनतेचं लक्ष या दसऱ्या मेळाव्यावर आहे.त्याचबरोबर अनेक राजकीय नेत्यांनी देखील दसरा मेळाव्याबाबात वक्तव्य केल आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दसरा मेळाव्यासंदर्भात एक महत्वाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस ?

दोन दसरा मेळावे होत असल्यामुळे गर्दीचे प्रमाण देखील खूप असेल, अशावेळी शिवसेनेतील दोन गटांमध्ये शांततेचं वातावरण राहिल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना ते असंही म्हणाले, दोन्ही गट शक्तिप्रदर्शन करणार असल्याने मुंबईतल्या गर्दीबाबत चिंता व्यक्त केली जातेय. या काळात समाज कंटकांनी स्थिती अस्थिर करू नये, याची पूर्ण काळजी घेतली जाईल.

तसेच देवेंद्र फसणवीस म्हणाले की, शिंदे आणि शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठीची भाषणाची स्क्रिप्ट तर जवळपास तयारच असेल. पण भाषणादरम्यान, प्रक्षोभक वक्तव्ये आणि असंसदीय शब्द टाळावेत, यासाठी नियमांची यादी तयारच असते. अशा वेळी कायद्यानुसार, कारवाई केली जाईल.

निघालेल्या शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात

दरम्यान, दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिवसैनिक मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. त्याच शिवसेनेच्या सामना ऑनलाईन या फेसबुक पेजवर काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. त्यात संभाजीनगर-दौलताबाद येथे समृद्धी महामार्गावरून जाताना शिंदे गटाच्या वाहनांचा अपघात झाल्याची पोस्ट शेअर करण्यात आली असून, 10 वाहनांचा चक्काचुर झाला असल्याचं पोस्टमध्ये म्हंटल आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!