टीम महाराष्ट्र देशा : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय पक्ष चांगलेच सक्रीय झालेले आहेत. याच पार्श्वभूमीवर नेते आणि कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी संवाद दौरा काढला आहे.
यानिमित्त सुप्रिया सुळे या अहमदनगरमध्ये आल्या होत्या. यावेळी बोलताना त्यांनी पक्षांतरावरून भाजपवर जोरदार टीका केली होती. त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये असताना वाईटअसणारे लोक भाजपमध्ये आल्यावर स्वच्छ कसे ठरतात? त्यासाठी कोणती वॉशिंग पावडर वापरली जाते? भाजपनं त्या पावडरचं नाव सांगावं अशा शब्दात भाजपवर हल्लाबोल केला होता.
सुप्रिया सुळेंच्या या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी ‘आम्ही कुठलाही वॉशिंग पावडर वापरत नाही. आमच्याकडं विकासाचं डॅशिंग रसायन आहे. नरेंद्र मोदी यांच्यासारखे नेते आहेत. ज्यांनी जगाच्या पाठीवर भारताला एक मजबूत देश म्हणून पुढं आणलंय. त्यांच्या नेतृत्वामुळंच अनेक पक्षांचे लोक आमच्याकडं येत आहेत असं विधान केले.
तसेच पुढे बोलताना ‘विरोधी पक्षांवर जनतेचा सोडा, त्यांच्या लोकांचाच विश्वास राहिलेला नाही. त्यामुळं त्यांनी भाजपच्या मेगाभरतीची काळजी करण्याऐवजी स्वत:च्या पक्षातील मेगागळतीची चिंता करावी अशा शब्दात सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
- फडणवीसांचा भक्तीरंग: महाजनादेश यात्रेवेळी वारकऱ्यांसोबत धरला ताल
- तुमच्या लेकाला आशीर्वाद द्या, धनंजय मुंडेंची परळीकरांना भावनिक साद
- सावरकरांच्या पुतळ्याला काळंं फासून सामाजिक तिढा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत- रुपाली पाटील ठोंबरे
- राष्ट्रवादीच्या झेंड्याला आता भगव्या झेंड्याची जोड
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

