टीम महाराष्ट्र देशा:- सावरकरांच्या पुतळ्याला काळंं फासून सामाजिक तिढा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत ,जर सावरकरांंचे विचार जर पटत नसतील तर तुम्ही कशाला एवढे रिअॅक्ट होत आहात अशी टीका मनसे नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी केली आहे.
दिल्ली विद्यापीठातील कला विभागाच्या बाहेर असलेल्या विनायक दामोदर सावरकरांच्या पुतळ्यास कॉंग्रेस पक्षाची विद्यार्थी विंग असणाऱ्या नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडियाच्या गुंडांनी गुरूवारी काळे फासले असल्याची घटना घडली आहे. एनएसयूआयचा दिल्ली प्रदेशाध्यक्ष असलेल्या अक्षय लकराने हे संतापजनक कृत्य केले आहे. एका बाजूला सोशल मिडीयावर या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत.
दरम्यान रुपाली पाटील ठोंबरे पुढे म्हणाल्या, सावरकर यांच्या शेजारीच भगतसिंग, सुभाषचंद्रबोस यांचा पुतळा आहे. तुम्हाला त्यांचे विचार पटतात आणि त्यांच्या शेजारी असलेल्या सावरकरांचे विचार का पटत नाहीत. विनाकारण लोकांमध्ये तेढ निर्माण करून सामाजिक शांतता भंग करण्याचा प्रयत्न आहे असे विधान त्यांनी केले आहे.
तसेच पुढे बोलताना त्यांनी ‘लोकांना जगण्यासाठी मुलभूत गोष्टीची गरज आहे. त्या गोष्टीवर बोलण्याची कॉंग्रेसला गरज आहे, पण असे काही प्रकरण घडवायचे आणि लोकांचे लक्ष्य दुसरीकडे विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. सावरकरांचे योगदान मोलाचे आहे म्हणून लोक त्यांना मानतात असे विधान केले.
महत्वाच्या बातम्या
‘विनाशकाले विपरीत बुद्धी, पुतळ्याला काळे फासून सावरकरांचे विचार संपणार आहेत का ?’
महापुरुषांची विटंबना करणं ही एक विकृती, रिपाईचा हल्ला बोल
…तोपर्यंत मोदींना हरवणे शक्य नाही, कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्याचे विधान


