Share

‘फडणवीसांनी अमित शाह यांना भेटल्यानंतर आता मोदींना भेटीसाठी वेळ मागितली’

Published On: 

नवी दिल्ली : महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. महाराष्ट्रातील विविध विषयांवर दोघांची जवळपास दीड तास चर्चा चालली. ‘ही राजकीय भेट नसून महाराष्ट्रातील सरकार पाडण्यात रस नाही’ असं वक्तव्य फडणवीस यांनी केलं.

अमित शाह यांना भेटल्यानंतर आपण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेटीसाठी वेळ मागितली असल्याचं फडणवीस म्हणाले ‘यंदा महाराष्ट्रात ऊसाचं पीक वाढलं, शेतकऱ्यांना FRP आणि साखर कारखान्यांना मदत मिळायला हवी, या मागणीसाठी दिल्लीत आलो, अमित शाह यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली’ अशी माहिती फडणवीस यांनी भेटीनंतर पत्रकार परिषद घेत दिली.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं फडणवीस म्हणाले आहेत. तसंच आपली संसदीय मंडळावर कोणतीही नियुक्ती झाली नसल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे.

भाजपमधल्या काही नेत्यांनी काल फडणवीस यांची संसदीय मंडळावर नियुक्ती झाल्याचं ट्विट केलं होतं, पण यानंतर लगेच पक्षाला अशाप्रकारचा कोणताही निर्णय झाला नसल्याचं सांगण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

अमिताभ बच्चन यांचा कवितेतून डॉक्टरांना सलाम; म्हणाले…

देव करो, देवेंद्र फडणवीस यांना कोरोना होऊ नये – गुलाबराव पाटील

क्रीडा विश्वात हळहळ : अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूचा कोरोनामुळे मृत्यू

‘परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे’

विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि भवितव्याचा विचार करूनच अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय – उदय सामंत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!