बंगळुरू : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. लॉकडाउनमुळे नियंत्रण असलेला करोनाचा प्रसार शिथिलतेनंतर वाढताना दिसून येत आहे. बॉलिवूड कलाकार अमिताभ बच्चन यांच्यापासून ते अनेक राजकीय नेत्यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा शिरकावं आता क्रीडा विश्वात देखील झालेला दिसून येत आहे. भारताचे माजी पॅरा-बॅडमिंटनपटू रमेश टिकाराम यांचे गुरुवारी कोरोनामुळे निधन झाले. पॅरा-बॅडमिंटन इंडियाचे अध्यक्ष एन सी सुधीर यांनी ही माहिती दिली.
‘अर्जुन अवॉर्डी, पॅरा बॅडमिंटनचे माजी खेळाडू व प्रशिक्षक श्री रमेश टिकाराम सर यांचे काल निधन झाले. गेल्या 2 आठवड्यांपासून तो कोविड -१९ पासून त्रस्त होता. सरांच्या अचानक झालेल्या नुकसानीमुळे पॅरा बॅडमिंटन परिवार दु: खी आहे. त्याचा आत्मा शांती लाभो’ असे ट्विट आहे.
Arjuna Awardee, Former Para Badminton player and coach, Shri Ramesh Tikaram Sir passed away Yesterday. He had been suffering from Covid-19 for the last 2 weeks.
Para Badminton Family is deeply saddened due to Sir's Sudden loss. May his soul rest in Peace???? Om Shanti???? pic.twitter.com/Gy0PtyE2Yo— Para-Badminton India (@parabadmintonIN) July 17, 2020
51 वर्षीय रमेश यांना ताप आणि खोकला होता आणि 29 जूनला त्यांना बंगळुरू येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रमेश यांच्या मागे पत्नी व दोन मुलं असा परिवार आहे. 2002मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कारानं गौरविण्यात आले होते. 2001मध्ये देशात आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धा आणण्यात रमेश यांचा मोठा वाटा होता, असे त्यांचे सहकारी के व्हाय वेंकटेश यांनी सांगितले.
भारताच्या माजी क्रिकेटपटूला कोरोनाची लागण
गडचिरोलीत पुन्हा एकदा फुगला कोरोनाचा आकडा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

