Share

अमिताभ बच्चन यांचा कवितेतून डॉक्टरांना सलाम; म्हणाले…

Published On: 

मुंबई : महानायक अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यानंतर त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. रुग्णालयात असले तरी बिग बी सोशल मीडियावर सक्रिय आहेत आणि त्यांनी ट्विटरवर एक कविता पोस्ट करत डॉक्टर व नर्सेसना सलाम केला आहे.

स्वत:च्या जिवाची पर्वा न करता कोरोनाच्या संकटातही रुग्णांची सेवा करणाऱ्या डॉक्टर्ससाठी त्यांनी या ओळी लिहिल्या आहेत. इतरांची सेवा करणारे हे डॉक्टर व नर्सेस पूजनीय असल्याचं त्यांनी या कवितेत म्हटलंय.

अमिताभ बच्चन यांची कविता-
श्वेत वर्ण आभूषण
सेवा भाव समर्पण
ईश्वर रुपी देवता ये
पीडितों के संबल ये
स्वयं को मिटा दिया
गले हमें लगा लिया
पूजा दर्शन के स्थान ये
परचम इंसानियत के

दरम्यान, अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन या दोघांची प्रकृती स्थिर असून उपचारांना चांगला प्रतिसाद देत आहेत. त्यांना किमान आणखी सात दिवस तरी रुग्णालयात राहावं लागणार आहे”, अशी माहिती रुग्णालयाने दिली आहे, तर ऐश्वर्या राय बच्चन व आठ वर्षीय आराध्या यांना देखील कोरोनाची लागण झाल्याने त्याना घरातच क्वारंटाइन करण्यात आलं आहे.

रिअलमीने भारतात आणला नवीन ‘स्वस्त’ स्मार्टफोन

‘या’ काँग्रेस नेत्याची कोरोनावर मात, रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

अमित शाह यांना आम्ही कधी म्हटलं का नया हैं वह….?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!