Share

‘परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे’

Published On: 

🕒 1 min read

पुणे : राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एकीकडे विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर युजीसी काय नेमका निर्णय देते याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्य सरकारने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, युजीसीने सेमीस्टर आणि अंतिम परीक्षा घेण्यास मान्यता दिली आहे. यासंदर्भात यूजीसीने एक नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यापूर्वी परीक्षा घेण्याची सूचना करण्यात आली आहे. तर राज्यात लॉकडाउनमुळे ऑफलाइन आणि ऑनलाइन पदव्युत्तर परीक्षा होणार आहे. युजीसीने नियमावली जाहीर केल्यामुळे देशभरातील विद्यापीठांना परीक्षा घेणे आता बंधनकारक असणार आहे.

खळबळ वगैरे काही नाही ही फक्त संज्याची वळवळ आहे, राणेंचा घणाघात

दरम्यान, या निर्णयाविरोधात आवाज आता बुलंद होऊ लागला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. युजीसीच्या नियमांप्रमाणे विद्यापीठ आणि कॉलेजच्या परीक्षा व्हाव्या असे पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने उच्च सचिवांना पाठवल्याची बातमी वाचली. परीक्षा पेक्षा विद्यार्थी महत्त्वाचे आहेत. परीक्षा आजच्या उद्या घेता येतील मात्र विद्यार्थांच्या आरोग्याचा विचार केंद्र सरकारने केला पाहिजे असं त्यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारने व्यवसायिक आणि गैर-व्यवसायिक कोर्स करणाऱ्या अंतिम वर्षातील शेवटची सेमिस्टर करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती सरकारकडून देण्यात आली होती. मात्र, यूजीसीच्या निर्णयानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!