मुंबई : ठाकरे सरकार करोनाबाबत गंभीर नाही. त्यांचे निर्णय आणि नियम केवळ कागदावरच असून त्याची अंमलबजावणी होत नाही, अशा शब्दात विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली.
सभागृहात पत्रकार अर्णब गोस्वामींवर हक्कभंग आणण्यापेक्षा करोनावर, शेतकऱ्यांच्या परिस्थितीवर, पूरस्थितीवर चर्चा होणे आवश्यक आहे. ती होणार नसेल तर आम्ही इथे आलो कशाला, असा सवाल करीत फडणवीस यांनी सरकारवर ताशेरे ओढले आहे.करोना संकटाच्या काळात सरकारवर टीका करण्याची आम्हाला हौस नाही. या काळात आम्ही संयमानेच वागेलो आहोत. मात्र, सरकार करोनाबाबत गंभीर असल्याचे दिसत नाही. जुलैपेक्षा ऑगस्टमध्ये मृत्युदरात वाढ झालेली आहे. देशात करोनामुळे झालेल्या मृत्यूंपैकी निम्मे महाराष्ट्रात झाले आहेत.
“एकही पत्राला उत्तर नाही. महाराष्ट्र हे देशातील प्रथम क्रमांकाचे राज्य आहे. मात्र करोनातही महाराष्ट्राने आघाडी घ्यावी अशी आमची इच्छा नव्हती. प्रत्यक्षात महाराष्ट्राची कोणाशीच तुलना होऊ शकत नाही इतके करोनाचे थैमान वाढले आहे,” अशा शब्दात फडणवीसांनी सरकारवर टीका केली.
महत्वाच्या बातम्या
मी ठणठणीत, तुम्ही पण काळजी घ्या- आ.मोनिका राजळे
अर्णव गोस्वामीनंतर आता कंगणावर आणला कॉंग्रेसने हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय गदारोळ
कंगनाच्या सुरक्षेसाठी आमच्या खिशातले पैसे जाणार का ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

