Share

अर्णव गोस्वामीनंतर आता कंगणावर आणला कॉंग्रेसने हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

Published On: 

मुंबई: आज विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामींवर हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला असून आता कॉंग्रेसही अभिनेत्री कंगणा राणावतवर विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव आणणार आहे. यासंदर्भात काँग्रेसचे आमदार भाई जगताप यांनी कंगनाविरोधात हक्कभंग मांडला. कंगनाने एका मुलाखतीत ड्रग्स घेतल्याचे सांगितले होते. कंगनाने महाराष्ट्राबद्दल काहीही बेताल वक्तव्य केले आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र राज्याच्या एका परंपरेच्या मर्यादा ओलांडल्या आहेत, अशा महिलेच्या विरोधात हक्कभंग आणत असल्याचे भाई जगताप यांनी सांगितले. दरम्यान, मुबंई महापालिकेने कंगनाच्या मणिकर्णिका फिल्म्स या मुंबईतील कार्यालयाबाहेर नोटीस लावली आहे. कंगनाने त्याठिकाणचे काम त्वरित बंद करावे अशी नोटीस याठिकाणी लावण्यात आली आहे. परिसरात बेकायदेशीर बांधकाम झाल्याचा आरोप मुंबई महापालिकेने केला आहे.

दरम्यान आजच मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केल्याप्रकरणी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर हक्कभंगाचा प्रस्ताव आणण्यात आला.अर्णव गोस्वामी सुपारीबाज पत्रकार आहेत, असा घणाघाती आरोप करत विधिमंडळ पावसाळी अधिवेशनादरम्यान शिवसेना सभागृहात आक्रमक झाली. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीलाच शिवसेना आमदारांनी पत्रकार अर्णव गोस्वामी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

“अर्णव गोस्वामी हेतुपुरस्सर आणि दुष्ट बुद्धीने वाईट बोलत आहेत. अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यू प्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. मात्र गोस्वामी कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. त्यांची ‘रिपब्लिक टीव्ही’ ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी” अशी मागणी आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

‘अर्णव गोस्वामी स्वत: न्यायाधीशाच्या भूमिकेत आहेत, स्वत: खटला चालवत आहेत, स्वत: निकाल देत आहेत’ अशा शब्दात परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांनाही चौकट दिली आहे. या प्रत्येकाच्या चौकटी सुसंगत राहाव्यात अस घटना म्हणते.

अर्णव स्वतःला न्यायाधीश समजतात का? हे कोण पत्रकार आहेत, ते सुपारी घेऊन काम करतात, असा अपमान करणाऱ्या पत्रकाराला शिक्षा झाली पाहिजे. एक घटना घडली तर पत्रकार संरक्षण कायदा आणला, म्हणून त्यांनी काहीही करायचं का?’ असा प्रश्न अनिल परब यांनी उपस्थित केला. त्यानंतर सभागृहाचे कामकाज 10 मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या:-

गेमिंग कम्युनिटीसाठी खुशखबर , PUBG करणार कमबॅक

राहुरीच्या राजकारणात धुमाळ गट पुन्हा सक्रिय!

‘हारामखोर‘ म्हणजे ‘नाॅटी’.. मग ‘संज्या’ म्हणजे ‘लंगोटी‘ ???

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!