Share

मी ठणठणीत, तुम्ही पण काळजी घ्या- आ.मोनिका राजळे

Published On: 

अहमदनगर/ऋषिकेश घोगरे:- महाराष्ट्र विधान मंडळाचे अधिवेशन सोमवार दि.७ पासून सुरू झाले. विधानसभा अधिवेशनात सहभागी होणाऱ्या प्रत्येक आमदाराला कोरोनाची चाचणी बंधनकारक केली होती. त्यानुसार शुक्रवारी मी आपली कोरोना चाचणी करून घेतली. त्यामध्ये मला कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्याने मी घरीच डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली उपचार घेत असून मी आता ठणठणीत आहे. सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन पाथर्डी-शेवगाव मतदारसंघाच्या आमदार मोनिका राजळे यांनी मतदार संघातील सर्व जनतेला केले आहे.

जनतेला आवाहन करताना आ.राजळे म्हणाल्या की, सध्या माझी प्रकृती स्थिर असून मला कोणताही त्रास होत नाही. त्यामुळे कोणीही काळजी करू नये. सर्वांच्या शुभेच्छा, पाठबळ, थोरामोठ्यांचे आशीर्वाद माझ्या सोबत आहेत. त्यामुळेच या संकटातून मी निश्चितच बरी होईल व पुन्हा तुमच्या सेवेत रुजू होईल याची मला खात्री आहे.

मला वैद्यकीय सल्ल्यानुसार किमान १४ दिवस किंवा पुढील कोरोना चाचणी निगेटीव्ह येईपर्यंत, विलगीकरण व वैद्यकीय निगराणीखालीच राहावे लागेल. त्यामुळे वैद्यकीय सल्ल्यानुसार मला कोणालाही भेटता येणार नाही. मतदारसंघातील कोणालाही काही अडचण असल्यास पाथर्डी कार्यालय किंवा शेवगाव कार्यालय येथे संपर्क साधावा. आपल्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य केले जाईल असे आ.राजळे म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या:-

अर्णव गोस्वामीनंतर आता कंगणावर आणला कॉंग्रेसने हक्कभंग प्रस्ताव, महाराष्ट्रात राजकीय गदारोळ

गेमिंग कम्युनिटीसाठी खुशखबर , PUBG करणार कमबॅक

राहुरीच्या राजकारणात धुमाळ गट पुन्हा सक्रिय!

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!