Share

कंगनाच्या सुरक्षेसाठी आमच्या खिशातले पैसे जाणार का ?

Published On: 

मुंबई : अभेनेत्री कंगना रणौतने मुंबईबद्दल केलेल्या विधानामुळे शिवसेना आणि कंगणामध्ये राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे. कंगनाने ट्विटवर मी ९ सेप्टेंबरला येत आहे काय करायचं ते करा असे विधान केले होते. यावरून कंगनाला धमक्याही आल्या होत्या. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कंगनाला केंद्र सरकारकडून वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

केंद्राकडून सुरक्षा दिल्यानंतर कंगनाने देखील ट्वीट करत अमित शाह यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली, ‘आता कोणत्याही देशभक्ताचा आवाज दाबला जाणार नाही हे यावरुन सिद्ध होतंय. मी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे आभार मानते. त्यांना वाटलं असतं तर ते मला काही दिवसांनंतर मुंबईत जाण्याचा सल्ला देऊ शकले असते. मात्र, त्यांनी भारताच्या या मुलीचा मान राखला आहे. त्यांनी माझ्या स्वाभिमान आणि आत्मसन्मानाची रक्षा केली आहे. जय हिंद.’

यानंतर आता हा निर्णय़ होताच त्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्याचं पाहायला मिळालं. कलाविश्वातही याचे पडसाद उमटले. ज्यामध्ये कंगनाला पुरवण्यात येणाऱ्या सुरक्षेसाठी आम्ही देत असणाऱ्या कराच्या पैशांचा वापर तर केला जात नाही, अशा आशयाचा प्रश्न अभिनेत्री कुब्रा सैत हिने विचारला आहे.

‘मी फक्त तपासत होते, की यामध्ये (सुरक्षेसाठी) आम्ही करस्वरुपात भरणाऱ्या पैशांचा वापर तर होत नाही?’, असं अभिनेत्री कुब्रा सैत हिनं ट्विट करत लिहिलं. कुब्रानं वृत्तसंस्थेच्या ट्विटची जोड देत तिचा हा बोचरा प्रश्न विचारला. कंगना आणि कुब्राचं समीकरण फार चांगलं नाही. कारण, कंगनानं तिला ट्विटरवर ब्लॉक केलं आहे.

महत्वाच्या बातम्या 

ठाकरे सरकार सुशांत प्रकरणी आवाज उठवणाऱ्या प्रत्येकाच्या विरोधात: अतुल भातखळकर

केवळ पंचनामे न करता शेतकऱ्यांना तातडीने पैसे द्या- स्नेहलता कोल्हे

वन विकासासाठी ‘बाहुबली’चा पुढाकार, केली इतक्या कोटींची मदत

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!