Share

मराठा आरक्षण विषयात या सरकारने मोठा घोळ घालून ठेवला आहे : फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई- राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. राज्याच्या विकासाला गती देण्यात अपयशी ठरलेले सरकार विरोधकांचा आवाज दाबण्यात मात्र तत्परता दाखवीत आहे. सरकारच्या या दमनशाही प्रवृत्तीवर सर्वोच्च न्यायालयानेही ताशेरे ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी आता तरी आपल्या पदाला साजेसं वर्तन करावे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केले.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीस बोलत होते. यावेळी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, मुंबई भाजपा अध्यक्ष आ. मंगलप्रभात लोढा, आ. अतुल भातखळकर, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी उपस्थित होते. मराठा आरक्षण विषयात या सरकारने मोठा घोळ घालून ठेवला आहे. सर्वोच्च न्यायालयात सरकारतर्फे नीट बाजू मांडली न गेल्याने मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाली. मराठा आरक्षणाबाबत आलेले अपयश झाकण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे नेते अन्य मागासवर्गीय समाज ( ओबीसी ) आणि मराठा समाजात वाद निर्माण करण्याचे प्रयत्न करीत आहेत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे, असेही त्यांनी नमूद केले.

फडणवीस यांनी सांगितले की, अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यातही आघाडी सरकारला अपयश आले आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातील शेतकरी अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी आहे. कोकणात निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीची प्रतीक्षा आहे. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आ. अतुल भातखळकर यांनी लिहिलेल्या आघाडी सरकारच्या वर्षभराच्या कामाचा पंचनामा करणाऱ्या पुस्तिकांचे प्रकाशन फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!