Share

‘राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे’

Published On: 

मुंबई : मुंबई भाजपच्या विद्यमान कार्यकारिणीच्या कार्यकाळातच मुंबई महापालिकेवर भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल, असा विश्वास व्यक्त करत भ्रष्टाचाराचे आगार असलेली मुंबई महापालिकेची सत्ता २०२२ मध्ये उलथवून लावायची, असे निर्देश भाजपाचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिले. या माध्यमातून फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाने बिहारनंतर आता ‘मिशन मुंबई’ सुरू केले आहे.

राजाचा जीव पोपटात, तर काहींचा जीव मुंबई महापालिकेत आहे. आता औदार्य नाही, प्रत्येक वार्डात, बूथमध्ये नेता नेमणार. प्रत्येक बूथमध्ये राजकीय कार्यकर्ते घडवा. युवा मोर्चाने प्रत्येक बूथमध्ये 50 युवा आणि महिला मोर्चाने 100 घरात महिलांना जोडलं पाहिजे. ज्याच्या डोक्यात सत्ता गेली त्याचं पतन निश्चित आहे. जनतेसाठी तो माज तोडावाच लागेल. 2022 साली मुंबई महानगरपालिकेवर भगवाच फडकेल, पण भाजपचा, असा आत्मविश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला.

दरम्यान, आरेतील मेट्रोचं कारशेड कांजूरमार्गला नेण्याचा निर्णय घेणाऱ्या ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. इच्छा तिथे मार्ग, असा एक वाकप्रचार आहे. मात्र आता इच्छा तिथे मार्ग, टाईमपास तिथे कांजुरमार्ग असं म्हणायला हवं, असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे.

दरम्यान, करोनाच्या काळातील भ्रष्टाचारावर आम्ही पुस्तिका तयार करीत आहोत लवकरच ही पुस्तिका प्रकाशित करु आणि यांचा खरा चेहरा समोर आणू. यांना करोनाची चिंता नव्हती तर करोनाच्या नावाखाली पैसा कसा खाता येईल याची चिंता होती. लॉकडाउनच्या काळात भरमसाठ वीजबिलं आली त्यावेळी सरकारनं केंद्राची मदत घेऊन सांगितलं की, बिलामध्ये सवलत देऊ पण ऊर्जा मंत्र्यांनी काल सांगितलं की कोणालाही सवलत मिळणार नाही, अशा प्रकारे सरकारने गरिबांशी विश्वासघात केला, असा आरोप यावेळी फडणवीस यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!