🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्रात भाजपचा मुख्य चेहरा असणारे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या खांद्यावर आता भाजपने मोठी जबाबदारी दिलेली आहे. पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाबसह पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने यासाठी तयारी सुरू केली आहे. पक्षाने बुधवारी पाच राज्यांच्या प्रभारींची नावे जाहीर केली आहेत.
यामध्ये राज्यात भाजपचे नेतृत्त्व करणारे फडणवीस गोवा विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर रयत क्रांती संघटनेचे नेते व आमदार सदाभाऊ खोत यांनी ट्वीट करून फडणवीसांना शुभेच्छा दिल्या आहेत.
‘देवेंद्र भाऊ विजयी भव: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार पाठोपाठ गोवा राज्याचे निवडणूक प्रभारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन. बिहारचा निवडणुकीप्रमाणेच गोव्यातही आपण यशस्वी नेतृत्व कराल यासाठी आपणास शुभेच्छा’ असे ट्वीट त्यांनी केले आहे.
दरम्यान भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना सर्वात महत्वाच्या अशा उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले आहे. भाजपने प्रधान यांच्यासह 8 केंद्रीय मंत्र्यांना यूपीमध्ये तैनात केले आहे. तर, पंजाबची जबाबदारी कॅबिनेट मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना देण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मुस्लिमानांनी मतं न दिल्याचा आरोप करताय, मुस्लिम काय कैदी आहेत का?; ओवैसींचा तिखट सवाल
- भाजपसोबत ‘डील’ केल्यानेच परमवीरसिंग NIA चे आरोपी नाहीत – राष्ट्रवादी
- एकनाथ खडसेंनी जमीन खरेदीत गैरव्यवहार केल्याचं स्पष्ट दिसतंय- ईडी
- ‘माझ्या बहिणीच्या पाठीशी मी सदैव आहेच!’, धनंजय मुंडेंचे सूचक वक्तव्य
- तालिबान सरकारसाठी चीनने केली ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
