Share

मुस्लिमानांनी मतं न दिल्याचा आरोप करताय, मुस्लिम काय कैदी आहेत का?; ओवैसींचा तिखट सवाल

Published On: 

🕒 1 min read

लखनऊ : एमआयचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव आणि बहुजन समाजवादी पक्षाच्या मायावती यांना चांगलंच धारेवर धरलं आहे. अयोध्येतील रुदौली येथून आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आपल्या पक्षाचा प्रचार सुरू केल्यानंतर सुलतानपूर जिल्ह्यातील ओड्रा गावात एका जाहीर सभेमध्ये यादव आणि मायावती यांच्यावर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

निवडणुकीनंतर अखिलेश यादव म्हणाले की हिंदूंनी मतदान न केल्याने मी हरलो असं न म्हणता, मुसलमानांनी मत न दिल्याचा आरोप केला. मुसलमान काय कैदी आहेत का?, असा तिखट सवाल यावेळी केला आहे. तसेच दोन्ही वेळा भाजप मुस्लिमांच्या मतांनी जिंकली नाही, अखिलेश यादव आणि मायावती यांच्या मुर्खपणामुळे नरेंद्र मोदी 2 वेळा पंतप्रधान झाले, असं म्हणत ओवैसींनी सपा, बसपावर जोरदार टीका केली आहे.

असं म्हणतात की, जर ओवैसी लढतील तर ते मत खातील. सुलतानपूरमध्ये सर्वांनी अखिलेश यादव यांना भरभरून मतं दिली तर तिथून भाजपचे आमदार सूर्यभान सिंह कसे निवडून आले?, २०१९ मध्ये तर मी निवडणूक लढवत नव्हतो, तेव्हा लोकसभा निवडणूक भाजपने कशी जिंकली?, असा सवाल यावेळी ओवैसी यांनी विचारला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!