🕒 1 min read
मुंबई : आयपीएलमध्ये गुरुवारी झालेल्या सामन्यात विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर बेंगळुरुने राजस्थान रॉयल संघाचा १० गडी राखुन पराभव केला. या विजयासह आरसीबीची विजयी घौडदौड कायम आहे. आरसीबी संघाचा स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे.
या सामन्यात पहिल्या डावात राजस्थानचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाजानी दिलेल्य़ा झुंजीमुळे १७७ धावांची मजल मारता आली. राजस्थान संघाचा महत्वाचा खेळाडू सलामीवीर जोस बटलर या सामन्यात केवळ ८ धावा काढु शकला. मात्र सामन्याच्या दुसऱ्या डावात जोस बटलरने असे काही केले ज्याने बटलरने चाहत्यांची मने जिंकली. सामन्यादरम्यान फलंदाजी करणारा आरसीबीचा सलामीवीर देवदत्त पडिक्कलच्या बुटाची सुटलेली लेस बटलरने बांधुन दिली.
#SpiritofCricket ????
Jos Buttler ???? Devdutt Padikkal#VIVOIPL pic.twitter.com/5dDsXeJPiM
— IndianPremierLeague (@IPL) April 22, 2021
पडिक्कल त्यावेळी राजस्थान गोलंदाजाची धुलाई करत होता. त्यावेळी अंतरराष्ट्रीय स्तरावरील एका दिग्गज खेळाडूने स्थानिक खेळाडुंच्या बुटाची सुटलेली लेस बांधणे चाहत्यांचे मन जिंकले. आयपीएल स्पर्धेत विविध देशाकडून खेळणारे आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवर खेळाडू एकत्र येऊन खेळतात. त्यामुळे चाहत्यासाठी एक पर्वणीच ठरते. त्यात बटलर सारखे खेळाडू चाहत्यांचे मन जिंकुन घेतात.
महत्वाच्या बातम्या
- धक्कादायक बातमी : ऑक्सिजनचा दाब कमी झाल्याने दिल्लीत २५ रुग्णांचा मृत्यू
- तिन प्रवाशांची वाहतूक, रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल
- पडीक्कलच्या ‘ फिनिशर’च्या ऑफरवर कोहलीने दिली ‘शतका’ची एक्सचेंज ऑफर
- लॉकडाऊनबाबत अमृता फडणवीसांकडून ठाकरे सरकारचे समर्थन
- वराती मागून घोडे : बंगालमध्ये रोड शो, पदयात्रा, बाईक रॅली आयोजित करण्यास मनाई
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
