🕒 1 min read
नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांना कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना कोलकाता येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोमवारी गांगुली यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. 49 वर्षीय गांगुली यांना एका वर्षात दुसऱ्यांदा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
यापूर्वी जानेवारी महिन्यात त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्यावेळीही त्यांना रुग्णालयात दाखल करावे लागले होते. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेऊनही त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. देशात ओमिक्रॉनची वाढती प्रकरणे पाहता गांगुली यांना झालेला संसर्ग चिंतेचा विषय आहे.
सोमवारी संध्याकाळी सौरव गांगुली यांची कोरोना चाचणी झाली. या अहवालानुसार, गांगुली यांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. खबरदारी म्हणून त्यांना लगेच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांना कोरोनाच्या कोणत्या प्रकाराची लागण झाली आहे हे शोधण्यासाठी आता त्याचा नमुना चाचणीसाठी पाठवण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई व्हावी- रुपाली ठोंबरे पाटील
- रोहिणी खडसेंच्या गाडीवर हल्ला करणाऱ्यास जशास तसे उत्तर देण्यात येईल; राष्ट्र्वादीचा इशारा
- रोहिणी खडसे हल्ल्याचा मुद्दा विधानसभेत मांडणार- चंद्रकांत पाटील
- ‘…यामुळे सापसुद्धा चावतो ही आधीच माहीत असलेली गोष्ट नव्याने समजली’
- ‘संत मुक्ताईच्या भूमीत महिला सुरक्षित राहतील ना?’, रोहिणी खडसेंचा मुख्यमंत्र्यांना सवाल


