परभणी : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप करत परभणी भाजपने नवाब मलिक यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणास विरोध केला होता. याबाबत भाजपने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. मंगळवारी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते, परभणीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोर आंदोलन करत घोषणाबाजी केल्याने पोलिसांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्यानंतर आज सकाळीच नवाब मलिकांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले आहे.
याबाबत नवाब मलिक यांनी ट्विट करत माहिती दिली. मलिक म्हणतात, ‘आज प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणी येथे पालकमंत्री या नात्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते पार पडला. तसेच अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना माझ्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय ही मूल्ये प्रदान करणाऱ्या भारतीय संविधानाचे रक्षण करण्यासाठी कटिबद्ध राहूया. सर्व भारतीयांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!’
आज प्रजासत्ताक दिनानिमित्त परभणी येथे पालकमंत्री या नात्याने ध्वजारोहणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते पार पडला. तसेच अनेक क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या व्यक्तींना माझ्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले. (१/३)#RepublicDay#RepublicDay2022#Parbhani pic.twitter.com/DZN3dX83tj
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 26, 2022
प्रजाकसत्ताक दिनी पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण केल्यास आंदोलनाचा इशारा देखील भाजपने दिला होता. मंगळवारी (दि.२५) रोजी सकाळी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉग्रेसच्या जिल्हा कार्यालयात बैठक आयोजित केली होती. या कार्यालयाच्या बाहेरच भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे यांच्यासह इतरांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांना संशय होता त्या सर्वांना स्थानबद्द केल्याची माहिती आहे.
महत्वाच्या बातम्या
- सिरम इन्स्टिट्यूटच्या सायरस पूनावाला यांना पद्मभूषण पुरस्कार; शरद पवार म्हणाले, “माझा बॅचमेट…”
- “अक्कलशून्य सरकारने संपूर्ण लोकशाहीच पायदळी तुडविली”; सोमय्यांना नोटीस पाठवल्यामुळे फडणवीस संतापले
- “माफियाराजवर बोलत असाल तर…”; धनंजय मुंडेंचे पंकजांना आव्हान
- कॅप्टन विराट होता, पण सगळे धोनीचं ऐकायचे दिनेश कार्तिकनं केला गौप्यस्फोट!
- आफ्रिका विरुद्ध एकदिवसीय मालिका गमावल्यानंतर के एल राहुलची भावनिक पोस्ट


