🕒 1 min read
औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारच्या वतीने अद्याप कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता यावी, या दृष्टीकोणातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत.
शनिवारी ९ ऑक्टोबरला दुपारी चार नंतर अजित पवार औरंगाबादमध्ये येणार आहे. तर पाच वाजता त्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीच्या दृष्टीने ते आढावा घेतील. तसेच कोव्हीड-१९ च्या दृष्टीनेही आढावा घेणार आहेत.
शेतकऱ्यांचे आणि शेतीचे नुकसान पाहता, सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सर्व लोकप्रतिनिधी देखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री काय निर्णय घेता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर ते लगेचच ते काही घोषणा करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला मराठवाड्यातील काही मंत्री तसेच सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित असतील.
महत्त्वाच्या बातम्या
- राणेसाहेब, हप्तेखोरांची नावं जाहीर कराच; वैभव नाईक यांचं ओपन चॅलेन्ज
- राणेसाहेब मंचावर मन मोकळं करणार आहेत, ते कुणाला आवडेल तर कोणाला खुपेल- नितेश राणे
- उद्धव साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी बाळासाहेबांचा आशिर्वाद- नितेश राणे
- नवाब मलिकांची आज पत्रकार परिषद; एनसीबीची पोलखोल करणार!
- लसीकरणाला गती देण्यासाठी सुरु करण्यात आलेले ‘मिशन कवच कुंडल’ अभियान नेमके आहे तरी काय ?


