Share

उपमुख्यमंत्री अजित पवार घेणार मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीचा आढावा

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : मराठवाड्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासंदर्भात मागणी होत आहे. मात्र, राज्य सरकारच्या वतीने अद्याप कोणत्याही प्रकारची मदत जाहीर करण्यात आलेली नाही. शेतकऱ्यांना तात्काळ मदत करता यावी, या दृष्टीकोणातून उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार औरंगाबाद दौऱ्यावर येत आहेत.

शनिवारी ९ ऑक्टोबरला दुपारी चार नंतर अजित पवार औरंगाबादमध्ये येणार आहे. तर पाच वाजता त्यांची विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये झालेल्या नुकसानीच्या दृष्टीने ते आढावा घेतील. तसेच कोव्हीड-१९ च्या दृष्टीनेही आढावा घेणार आहेत.

शेतकऱ्यांचे आणि शेतीचे नुकसान पाहता, सरसकट मदत करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. सर्व लोकप्रतिनिधी देखील त्यासाठी आग्रही आहेत. त्यामुळे उपमुख्यमंत्री काय निर्णय घेता, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर ते लगेचच  ते काही घोषणा करण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. या बैठकीला मराठवाड्यातील काही मंत्री तसेच  सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी उपस्थित असतील.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!