Share

वंचित औरंगाबाद मनपाच्या सर्व जागा लढवणार

Published On: 

औरंगाबाद: प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या वतीने औरंगाबादमधील पालिकेच्या सर्वच्या सर्व जागा लढवण्यात येणार असल्याचे पक्षाचे निवडणूक निरीक्षक फारुख अहमद यांनी स्पष्ट केले. आगामी महानगरपालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचे देखील ते म्हणाले.

एल्गार परिषदेचा आणि वंचित बहुजन आघाडीचा काहीही संबंध नाही. मात्र, या परिषदेमध्ये व्यक्त करण्यात आलेले मत हे वैयक्तिक स्वरूपाचे आहे. कोणत्याही समाजावर सरसकट टीका करता येत नाही आणि असे करायलाही नको होते असे देखील ते म्हणाले. मात्र, त्याच बरोबरच ही टीका कोणत्या वेदनेतून करण्यात आली ती भावना देखील समजून घ्यावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

सध्या अस्तित्वात असलेल्या सर्वच पक्ष वंचित आणि बहुजन समाजाला न्याय देण्यात कमी पडले आहे म्हणूनच वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून दलित शोषित घटकांना न्याय देण्याचे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं. दरम्यान, औरंगाबाद महानगरपालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते मिलिंद दाभाडे यांनी वंचित बहुजन आघाडी मध्ये प्रवेश केला. मिलिंद दाभाडे यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची शहरातील ताकत चांगलीच वाढली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये मिलिंद दाभाडे यांचे वर्चस्व आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!