Share

नागरी समस्यांसाठी बहुजन समाज पक्षाची मनपासमोर निदर्शने

Published On: 

औरंगाबाद : झोपडपट्ट्यांमध्ये विकासकामे अतिशय संथ गतीने होत आहेत. येथील अनेक योजना या थंडबस्त्यात आहेत. या योजना तात्काळ पूर्ण करून नागरिकांना याचा लाभ द्यावा यासाठी बहुजन समाज पार्टीच्या वतीने महापालिका मुख्यालयासमोर सोमवारी (दि.८ ) निदर्शने काढण्यात आली.

आंबेडकरनगर चौकामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्पिटल करिता पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात यावा, रमाबाई आवास योजना घरकुल आवास योजनेअंतर्गत पाच लाख रुपयांचे औरंगाबाद मनपा हद्दीतील शहरातील प्रत्येक लाभार्थ्यांना घरकुल मंजूर करण्यात यावे, ज्यांच्या घरकुलाचे काम चालू आहे त्यांना तात्काळ चेक देण्यात यावा.

औरंगाबाद शहरातील सर्व झोपडपट्ट्यांना पीआर कार्ड देण्यात यावे, ड्रेनेज व दूषित पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यावा अपंग वयोवृद्ध बेरोजगार लोकांना महापालिकेतर्फे एक लाख लाख अनुदान देऊन मदत करावी महिला बचत गटांना सक्षम बनवण्यासाठी मनपातर्फे पाच लाख रुपये कर्ज देण्यात यावेयाव, पदवीधर असलेल्या मुली व मुलांना वेगवेगळे मोफत प्रशिक्षण देण्यात यावे या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पंडित बोर्डे, सचिन बनसोडे, किशोर म्हस्के, भारती सोनवणे, समाधान जाधव, नदीम चौधरी, महेंद्र सोनवणे यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!