नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना आरोग्य यंत्रणा कमी पडत आहे. या मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन जनरेटर यांचाही समावेश आहे. मात्र, कोरोना रुग्ण संख्या आणि सुविधांचा विचार करता केंद्र सरकारने १७ प्रकारची वैद्यकीय उपकरणे आयात करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय मंत्री पियूष गोयल यांनी या संबंधीची माहिती दिली आहे.
या संदर्भात पियूष गोयल यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी आयात करण्यासाठी परवानगी दिलेल्या उत्पादनांची यादीही प्रसिद्ध केली आहे. यात नेब्युलायझर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, ऑक्सिजन जनरेटर आणि व्हेंटिलेटर यांचाही समावेश आहे. यामुळे देशातील कोरोना रुग्णांना वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे.
Govt. under the leadership of PM @NarendraModi ji permits importers of medical devices for making mandatory declarations required under Legal Metrology Rules, 2011 after custom clearance & before sale.
This will help fulfil ???????? demand of medical devices required for COVID-19. pic.twitter.com/Jyj8EXMdAw
— Piyush Goyal (@PiyushGoyal) April 29, 2021
यामुळे कोरोना रुग्णांना वैद्यकीय मदत मिळण्यास सुलभ होईल, असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला आहे. कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे जगभरातील अनेक देशांनी भारताला मदत देवू केली आहे. अनेक देशांमधून भारतासाठी वैद्यकीय उपकरणे देण्यात येत आहे. त्यामुळे भारतातील वैद्यकीय उपकरणाची गरज पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- वऱ्हाड निघालंय पोलीस स्टेशनला! हळदीला गर्दी झाल्याने महिला सरपंचावर गुन्हा
- राज्य सरकारने आकडेवारीची लपवाछपवी करू नये-फडणवीस
- ‘युपी, गुजरातपेक्षा महाराष्ट्रात परिस्थिती चांगली’, मेधा पाटकर यांची प्रतिक्रिया
- ‘सभा, कमी लसीकरणामुळे भारतात परिस्थिती बिघडली’, डब्ल्यूएचओने सुनावले
- पोलिसांच्या चकमकीत दोन कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा


