🕒 1 min read
मुंबई : सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अंतर्गत गट क आणि गट ड प्रवर्गातील जागांसाठी होणारी भरती परीक्षा बाह्यस्त्रोत संस्था न्यासा यांच्या अकार्यक्षमतेमुळे पुढे ढकलण्यात येत असल्याची माहिती ऐनवेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आणि यामुळेच अनेकांच्या मनात संशयाची पाल चुकचुकली असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच आता एका वृत्तवाहिनेने व्हायरल ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केल्याने खळबळ माजली आहे.
वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या ऑडिओ क्लिपमध्ये भरतीसाठी एजंटमार्फत 15 लाख मागितले जात असल्याचे ऐकायला मिळाले आहे. तर समोरचा व्यक्ती क्लास डी साठी 6, क्लास बी साठी 13 लाख रुपये रेट असल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. काम शंभर टक्के होणार, अशी एजंटकडून लोकांना बतावणी करण्यात येत आहे.
दरम्यान याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दलाल घुसल्यामुळेच आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाल्याचा संशय व्यक्त केला होता. विद्यार्थ्यांकडे 5, 10 ते 15 लाख रुपयांची मागणी करुन, भरती करण्याचं आश्वासन दिलं जात आहे. त्यामुळे परीक्षा रद्द का झाली याची तर चौकशी व्हायलाच हवी, पण या दलालांचाही शोध घेऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आता ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षकांनी यशस्वीपणे पार पाडावी – भुजबळ
- मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर अपघात, इंदोर-पुणे रेल्वेचे दोन डबे रुळावरून घसरले
- पश्चिम महाराष्ट्रात नव तंत्रज्ञानाच्या उपयोगातून रस्त्यांचे जाळे निर्माण करणार – नितीन गडकरी
- ‘अधिकाऱ्यांनी न्यायालयाच्या अवमानाची…’, मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांचे खळबळजनक वक्तव्य
- धर्मांतर रॅकेट : नाव बदलून राहणाऱ्या ‘आतिफ’ला ATSने नाशकातून केली अटक
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
